मला जशा छळतात

Submitted by शब्दरचना on 26 February, 2019 - 12:05

मला जशा छळतात तशा तुलाही छळतात का रे माझ्या आठवणी ?
कधी गोडसं हसू , कधी लटका राग , कधी चिड-चिड
तर कधी येत का रे टचकन तुझ्या डोळ्यात पाणी ?

अलगद कधी मग वाटतं तुला मी कुठूनतरी यावं
जणू काही झालंच नाही असं तुझ्या मिठीत शिराव
पुन्हा फिरुन तुझ्याशी उगाचच भांडाव
तुलाही वाटत का सांगणा मी अजुनही 'bus stop'वर तुझी वाट पहात बसाव??

मी तर रोज ठरवते . . . आता तुला आठवायचं नाही
आठवून आठवून सारं पुन्हा आता रडायचं नाही
पण अस ठरवूनही काही होतच नाही
तुला आठवायची हाैस काही फिटतच नाही

अन् मग पुन्हा नव्याने सज्ज होतात तुझ्या आठवणी
मला छळण्यासाठी . . .
खरंच फक्त एकदा सांग मला जशा छळतात तशा तुलाही छळतात का रे माझ्या आठवणी ?
छळून छळून तुला आणतात का रे माझ्यासारखच तुझ्याही डोळ्यात पाणी ?

Group content visibility: 
Use group defaults

जमलीये

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे....