आस्तिक ? नास्तिक ?

Submitted by ओजस्व on 26 February, 2019 - 05:17

गुढी पाडव्याच्या आदल्या रात्री रस्त्यावर एक म्हातारा आणि म्हातारी भीक मागताना दिसले. खांद्यावर सामान घेऊनच फिरत होते. एकंदर बघून अंदाज आला कोण असतील ते.जवळच्या दुकानातून थोडी फळं घेतली. त्यांना द्यायच्या आधी चौकशी केली कि कुठून आलात वगेरे. ते म्हटले शिर्डीहून आलो. गावात पाणी नाही शेतात काम नाही..त्यांना फळं देऊ केली तर हात जोडून नको म्हटले..म्हटलं तुम्हाला बघून घेतली आहेत..तर त्यांनी स्वीकारली..थोडे पैसे देऊ केले तर नको म्हटले..२ दिवस पोट भरेल असं काहीतरी द्या..थोडे डाळ तांदूळ घेऊन दिले...आशीर्वाद देऊन निघून गेले..निघताना रस्त्यच्या दुसर्या बाजूला बसलेली तरुण मुलगी आणि तिच्याकडचे लहान बाळ हे पण आमचे आहे असे म्हटले..

घरी आल्यावर विचार केला..जे केले ते बरोबर केले का ?

आस्तिक मन लगेच बोलले...किती नशीबवान आहेस तु...आज गुरुवार होता..माणुस शिर्डीहून आला होतं...दाढी होती का...हो...म्हणजे साक्षात...

तेव्हा नास्तिक मन म्हटले...इतका विचार करू नकोस..२ दिवस पोट भरेल याची व्यवस्था झाली..सध्या तु इतकंच करू शकतोस..जुने मराठी वर्ष संपताना काहीतरी चांगले झाले असं समज...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users