बास ना मित्रा, किती हसतोस तू ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 February, 2019 - 21:32

कोरडी झालेय मी, म्हणतोस तू !
अंगणी माझ्या कुठे पडतोस तू

एवढ्यासाठीच झाले खत तुझे
ऐकले की सावली धरतोस तू

फेकतो काडी घरावर पेटती
अन स्वतः आगीत त्या जळतोस तू

मी तुझे प्रतिबिंब हे जो सांगतो
आरसा त्यालाच दाखवतोस तू ?

दंतमंजन कोणते आहे तुझे
बास ना मित्रा किती हसतोस तू ?

सोसल्यावरही किती स्थितप्रज्ञ ती
कल्पनेनेहीे किती कण्हतोस तू

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या गझला खूप छान असतात, पण एखादाच शेर अगदी अनावश्यक वाटतो, जो पूर्ण गझलेचा mood बदलून किंवा खरं तर बिघडून टाकतो.. आणि तुम्ही नेमक्या त्याच शेरातून शीर्षक घेता!
बाकी सब मस्त है!