पदरावरती जरतारीचा (विडंबन)

Submitted by दत्तात्रय साळुंके on 22 February, 2019 - 03:43

( आजच दूरदर्शन वर बातमी झळकली बाजारात निवडणुकीच्या मुहूर्तावर पदरावर मोदींचा चेहरा असलेली साडी विक्रीसाठी आली आहे. बातमी पाहिल्यावर मनात आले ही साडी परिधान केल्यावर बीजेपी समर्थक स्त्रीच्या भावना काय असतील ? मग पुढील विडंबन सुचले. सादर करण्यापूर्वी कविवर्य ग दि माडगूळकर यांची माफी मागतो.)

पदरावरती गाली हासरा मोदी चेहरा हवा
आई मला नेसव शालू नवा...

बांधला सैलसर बुचडा मानेवरी
माळले भगवे कमळ मी त्यावरी
केशरी झाक उजळली भाळावरी
केसांवरती लहर उठवली फिरवूनी कंगवा

डोळ्यात रेखिले काजळ मी विकासाचे
कानात चमकते झुंबर त्या उज्वलेचे
दुप्पट्टयावरी बुट्टीदार छाप बघ कमळाचे
गो-या भाळी बिंदी केशरी चमचमता काजवा

मज भुलवावयास येत विरोधी जन ते
पाहीले काल अन् आजही त्या जाणते
दुर्गुणी तयांना जनता ही पूरती ओळखते
फिरुनी एकदा मोदी हवा घुमतो गं पारवा

© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी ! कसलं सुचलंय !!
एकदम खरं सांगायचं तर ती बातमी वाचून मला पण अगदी हेच आठवलं होतं
पदरावर्ती ५६ इंची मोदी चेहरा हवा .. पुढे विडंबन वगैरे करायची उडी नाही मारली Proud

मस्त! कंगवा, काजवा, पारवा एक्दम फिट बसलं आहे. काळ्यामाऊची नजर कशी पडली नाहि अजुन या साडीवर?.. Proud

@ शाली, anjali_kool, कुमार १, वाले, राज
खूप धन्यवाद प्रतिसादासाठी...

प्रियंका साडी देखील आली आता.

Submitted by बिपीन चन्द्र हर...
बिपीनजी काय काय पहायला मिळेल कोण जाणे. मला वाटते एखाद्या साडीला एक पदर मोदींचा आणि दुसरा प्रियंका असू शकतो. सकाळी BJP ( कमाई ५००). सायंकाळी प्रियंका ( कमाई ५००) . T-shirts आतली बाजू राहूल, बाहेरची बाजू मोदी . ‌