अपमान फुलांचा

Submitted by Asu on 21 February, 2019 - 23:11

अपमान फुलांचा

आडवाटे दूर डोंगरी
रानफुलांनी फुलली दरी.
कडेकपारी हिरव्या रानी,
सांगे वारा कानाेकानी.

लाल गुलाबी, निळा जांभळा
शुभ्र पांढरा, सुंदर पिवळा.
नंदनवन जणु भू अवतरले
कि रंगांचे संमेलन भरले.

दिवसा मागुन दिवस जाती,
वाट पाहुनि फुले हिरमुसती.
मानवा असे उसंत कसली !
कौतुक घेण्या फुले आसुसली.

अपमाने मग ती काळवंडली,
अन् एकसाथ ती काेमेजली.
कुणा ना हे रहस्य कळले,
दऱ्या-डोंगर कधी ना फुलले.

- प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults