31 डिसेंबर हा काळा दिवस आहे ह्याच दिवशी भारताचे प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयीं ह्यांनी कट्टर अतिरेकी व त्यांचा मास्टर माईंड ना कंदहार येथे नेऊन सोडले होते. सन 1999 ?
■अशीही बातमी आहे कि 100 कोटी रुपये परकीय चलनात दिले गेले होते. खरेच दिले गेले होते का ?
■ह्याच अतिरेक्यांनी नंतर संसदेवरील हल्ला, मुंबईतील अतिरेकी हल्ले घडवले.
■9/11 ट्वीन टॉवर वरील हल्ल्यात ह्यातील एका अतिरेक्याने मदत केली होती.
■भारतात हल्ले घडवण्यास ह्याच अतिरेक्यांनी हजारो अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले.
■हजारो नागरिक, जवान ह्यामुळेच अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले.
■आणि हे सर्व झाले भाजपा आणि बाजपेयींमुळे.
★आता इंदिरा गांधींनी अतिरेक्यांना काय वागणूक दिली होती ते बघू
★मकबूल भट्टची फाशी टाळण्यासाठी लंडन मधील भारतीय उच्चायुक्तातील कर्मचारी श्री रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण JKLF ने केले.
★ रवींद्र म्हात्रे हे कनिष्ठ कर्मचारी होते. त्यांना ओलीस धरून मकबूल भट्ट च्या मुक्तीची मागणी करण्यात आली. इंदिरा गांधी यांनी तत्काळ राष्ट्रपतींना विनंती करून त्याचा दया अर्ज फेटाळून मकबूल भट्ट ला फासावर लटकावले.
★अतिरेकी संतप्त झाले आणि त्यांनी म्हात्रे यांची निर्घुण हत्या केली. इंदिरा गांधी तत्काळ म्हात्रे यांच्या वृद्ध पित्याला भेटण्यास मुंबई ला आल्या त्यांचे हात हातात घेऊन त्यांची माफी मागितली.
★मी तुमच्या मुलाला वाचवू शकले नाही, मी तुमची वैयक्तिक गुन्हेगार आहे. परंतु माझ्याकडे दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. तुमच्या मुलाच्या या बलिदानाबद्दल हा देश त्याचा कायमचा ऋणी राहील.
★याच रवींद्र म्हात्रे यांचे नाव पुण्यातील म्हात्रे पुलाला दिले गेले आहे. एक नेता म्हणून कठोर निर्णय घेणे आणि संबंधित कुटुंबाची स्वतः भेटून माफी मागणे याला सहृदयी काळीज लागते
■■■बाकी रुबिया सईद हिला सोडतानाही भाजप समर्थीत VP सिंग ह्यांचे सरकार दिल्लीत सत्तेवर होते.
■■■पुरुलिया प्रकरणातील रशियन आरोपींना वाजपेयींनीच रशियाच्या हवाली केले होते.
31 डिसेंबर एक काळा दिवस
31 डिसेंबर एक काळा दिवस
<<
एकादा डोक्यावर पडलेला माणूसच असे काही बरळेल.
--
ज्यांची तळी तुम्ही विविध अवतारात, सदानकदा उचलता त्या कॉंग्रेसने देखील आजवर असे काही म्हटले नाही.
--
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1991714860864245&id=10000077...
--
ढापलेले लेख इथे प्रसिद्ध करणे, मायबोली धोरणा विरुद्ध आहे.
अनिरुद्ध,
अनिरुद्ध,
डोके नसतानाही डोक्यावर पडता येते हा शोध लावल्याबद्दल तुम्हाला अड्डा जीवनगौरव पुरस्कार कोणाला द्यायचा असला तर सांगा, मी देईन
काही अतिरेक्याना नाइलाज
काही अतिरेक्याना नाइलाज म्हणुन सोडावे लागले, सरकारचा नाइलाज होता, हे जरी मान्य केले तरी , त्यापैकी एका अतिरेक्याने एक गट स्थापन केला, २००० साली,
आणि आजच्या पुल्वामा ह्ल्ल्यातही त्यांचाच हात आहे, २००० ते २०१७ , अजुन त्याची फले निश्पाप लोक/भारतीय सैनिक भोगत आहेत, हे फारच दुख्दायक आहे.
इतिहास विसरला जाउ नये, इत्काच ह्या धाग्याचा उद्देश आहे.
पर्फेक्ट दोन्ही गळाला लागलेत.
पर्फेक्ट दोन्ही गळाला लागलेत. अभिनंदन जामोप्या.
"इंदिरा गांधी यांनी तत्काळ
"इंदिरा गांधी यांनी तत्काळ राष्ट्रपतींना विनंती करून त्याचा दया अर्ज फेटाळून मकबूल भट्ट ला फासावर लटकावले."
=> कारण इंदिराबाईंची स्वत: गोळ्या झेलण्याची तयारी होती. स्वत: धोका पत्करू शकणारे जिगरबाज नेतेच असे धाडसी निर्णय घेऊ शकतात. बाजारबुणग्यांचे ते काम नोहे. विपी सिंगनी सैद कन्येच्या बदल्यात सात अतिरेक्याना सोडले होते. त्यानंतर कश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांद्वारा अनेक अपहरणे झाली. वाजपेयींनी मसूद अज़हरला सोडले. परीणाम अजूनही भोगतोय देश.
गांधी , जिना , अफझल , जयचंद
गांधी , जिना , अफझल , जयचंद वगैरे इतिहास फुंकणार्याना बाजपेयींने अतिरेक्यांना सोडले , हे मात्र झाकून ठेवावेसे वाटते.
काँग्रेसने मसूदला पकडले , भाजपेयींने सोडले,
भाजपेयींने अफजलला पकडले, काँग्रेसने फाशी दिली.
काँग्रेसने कसाबला पकडले , काँग्रेसने फाशी दिली.
<< काही अतिरेक्याना नाइलाज
<< काही अतिरेक्याना नाइलाज म्हणुन सोडावे लागले, सरकारचा नाइलाज होता, हे जरी मान्य केले तरी , त्यापैकी एका अतिरेक्याने एक गट स्थापन केला, २००० साली, >>
-------- हे जरी मान्य असले तरी अतिरेक्यांच्या सोबत जसवंत सिंग, भारताचे त्यावेळचे पर-राष्ट्र मंत्री. देवाण- घेवाणीच्या दरम्यान त्यांनी मंत्र्यालाच अडकवले असते तर ? (असे कोण म्हणाले होते ? ) सोबत पैशांची पण मागणी होती. खुप भोंगळवाणे प्रदर्शन होते.
म्हात्रेंची हत्या आजही आठवते.
अशाच घटनांत नेतृत्वाची खरी कसोटी असते...
अतल बिहारी सरकार आजवरचे
अतल बिहारी सरकार आजवरचे कमकुवत सरकार म्हणुनच ओळखले जाते.
१. संसदेवर अतिरेकी हल्ला
२. पाकिस्तानकडुन कारगील कुरापत
३. परराष्ट्र मंत्र्यांनी कुख्यात अतिरेक्याला चार्टर्ड विमानाने करोडॉ डॉलर्सच्या बॅग्स सोबत कंदाहरला पोहचवले.
४. इंदिरा गांधी सरकारने भारताची अण्वस्त्रसज्जता दाखवली असतानाही काहीही कारण नसताना अटलबिहारी सरकारने पोखरण अणुस्फोट घडावुन जगाकडुन निर्बंध लादुन घेतले जे नंतर मनमोहन सरकारने जगाच्या नाकदुर्या काढुन उठवले.
विमानात किती प्रवासी होते .
विमानात किती प्रवासी होते .
ह्याची पण माहिती द्या .
त्यांचे नातेवाईक काय प्रतिक्रिया देत होते .
समजा इंदिराजी सारखं समझोता केला नसता आणि अतिरेक्यांनी विमान नष्ट केले आस्ते .आणि प्रवाशांच्या जीवाला धोका झाला असता तर ज्यांनी प्रश्न विचारला आहे त्यांनी सरकारच समर्धान केले असते
समझोता केला नसता आणि
समझोता केला नसता आणि अतिरेक्यांनी विमान नष्ट केले आस्ते
}} अतिरेकि लोक अतिरेक्यांसारखे विचार करतात. चोर चोरासारखा. मुत्सदी लोक, राजकारणी लोक पोलिस लोक आपल्या पातळीनुसार विचार करतात. चाणाक्ष मुत्सद्दीपणा लागतो आपले काही नुकसान न करता काही गोष्टी घडवून आणायला. ज्याची संघी शाखाबहाद्दरांकडे मुळातच वानवा आहे. . ज्यांना दंगली भडकवणे, लोकांमध्ये फूट पाडणे, कुजबूज मोहिम राबवून बदनामी करणे एवढेच येते त्यांची पितळं अशी कसोटीची परिस्थिती आली की उघड्यावर पडतात मग शेपुट घालतात हे दिसले आहे. शाखाशिबिरात लुटूपुटूच्या लढाया बालिशपणे खेळणे आणि खरोखर आंतरराष्ट्रीय प्रश्नांना कुशलतेने हाताळु शकणे ह्यात प्रचंड फरक असतो हे संघभाज्पला कळेल असे वाटत नाही.
म्हात्रे न चा जीव न जाता
म्हात्रे न चा जीव न जाता समस्या त्या वेळी सुधा सोडवता आली नाही कुशल लोकांना काय कारण असतील .
विषयाला धरून उत्तर अपेक्षित फाटा पाडणे अयोग्य
वाजपेयी आणि इंदिरा आता च्या
वाजपेयी आणि इंदिरा आता च्या निवडणुकीत असते तर किती बरं झालं असतं नाही का? हा लेख वाचून सरळसरळ इंदिरा गांधींना मते दिली असती लोकांनी आणि त्यांनी पाकिस्तानची पळता भुई थोडी केली असती.
पण दुर्दैव हे कि सर्जिकल स्ट्राईक मंजूर करणारे मोदी भाजपकडून आहेत, तर सर्जिकल स्ट्राईक आम्हीपण केले, पण ते कुणाला नाही सांगितले असं म्हणणारे मनमोहन सिंग (कुणाकडूनच नाहीत सध्या).
मतदानाचा दिवस येईपर्यंत भूतकाळात काँग्रेसच्या नि भाजपच्या नेत्यांनी काय चांगली आणि वाईट कामे केलीत हे बघण्यापॆक्षा आता निवडणुकीला उभ्या असलेल्या तुमच्या मतदारसंघातल्या उमेदवारावर लक्ष केंदित करा आणि त्यातल्या चांगल्या उमेदवारांना निवडून द्या नाहीतर नोटाचा पर्याय निवडा. ते कठीण (हल्ली लोकाना स्थानिक माहितीपेक्षा जागतिक माहिती जास्त असते !) वाटत असेल तर पंतप्रधानपदासाठी संभाव्य उमेदवार "सध्या" कोण आहेत हे पाहून मते द्या, कारण ती व्यक्ती "देशाची" पुढील ५ वर्षे कशी असतील ते ठरवणार आहे.
70 वर्ष ऐकाच पॉइंट वर
70 वर्ष ऐकाच पॉइंट वर रक्तरंजित संघर्ष म्हणजे भारत आणि पाकिस्तान मधला काश्मीर प्रश्न .
जगाच्या पाठीवर ऐकमेव आस उदाहरण आसेल .
आणि अजून किती काळ चालतोय हे पण माहीत नाही
जगाच्या पाठीवर ऐकमेव आस
जगाच्या पाठीवर ऐकमेव आस उदाहरण आसेल . > ऑ, इस्त्रायल-पॅलेस्टीन प्रश्न सुटला जनु
हो तो ऐक जुना प्रश्न अजुन
हो तो ऐक जुना प्रश्न अजुन धगधगत आहे
<<समजा इंदिराजी सारखं समझोता
<<समजा इंदिराजी सारखं समझोता केला नसता आणि अतिरेक्यांनी विमान नष्ट केले आस्ते .आणि प्रवाशांच्या जीवाला धोका झाला असता तर ज्यांनी प्रश्न विचारला आहे त्यांनी सरकारच समर्धान केले असते >>
---- रविंद्र म्हात्रे प्रकरणांत इंदिरा गांधी यांनी कुठलाही समझोता केला नाही. त्यांचा कणखरपणा त्यांनी कृतीने दाखवला. कणखर नेतृत्वाची खरी कसोटी संकटाच्या वेळीच असते.
मानवी हत्या झाली, त्याची जबबादारी घ्यायची त्यांनी तयारी ठेवली होती.
रविंद्र म्हात्रे प्रकरणांत
रविंद्र म्हात्रे प्रकरणांत इंदिरा गांधी यांनी कुठलाही समझोता केला नाही. त्यांचा कणखरपणा त्यांनी कृतीने दाखवला. कणखर नेतृत्वाची खरी कसोटी संकटाच्या वेळीच असते.
मानवी हत्या झाली, त्याची जबबादारी घ्यायची त्यांनी तयारी ठेवली होती.
>>>>>>>>>
रविंद्र म्हात्रे प्रकरणात ते स्वत: एकमेव ओलीस होते आणि कंदहार विमान अपहरणात १८९ (१७८ + ११) याची काही अर्थाअर्थी तुलना आहे का?
दुबईमध्ये विमानावर हल्ला करण्याच्या प्रयत्नाला फारूख अब्दुल्लांनी सुरुंग का लावला?
https://indianexpress.com/article/india/india-others/india-wanted-to-rai...
येनकेनप्रकारेण सरकारला शिव्या घालण्यासाठीचा आणखीन एक केविलवाणा प्रयत्न यापलिकडे काही अर्थ नाही.
<< रविंद्र म्हात्रे प्रकरणात
<< रविंद्र म्हात्रे प्रकरणात ते स्वत: एकमेव ओलीस होते आणि कंदहार विमान अपहरणात १८९ (१७८ + ११) याची काही अर्थाअर्थी तुलना आहे का? >>
------- आजवर त्या मास्टर माईंडने किती लोक मारले आहेत, भविष्यात अजुन काय वाढेन ठेवले आहे, याचा केवळ अंदाजच करता येतो. निव्वळ आकडे १८९ / १ अशी बरोबरी करणे अयोग्य आहे. आपण कुणाला सोडत आहोत ? तो काय माणुस आहे ? पकडायला किती त्रास झाला ? पाक मधे गेल्यावर तो काय शांत रहाणार होता का? अर्थात हा विचार त्या वेळी केलाच असेल... पण...
कसोटीचा क्षण हा दर दिवशी येत नाही, त्या कसोटीच्या क्षणी हात-पाय गाळुन 'ठिक आहे... क्र. १ अतिरेकी हवा... चल घे..... क्र. २ अतिरेकी हवा का... तो पण घे.... सोबत पैसे ? ते पण घे.... देशाचा पर-राष्ट्र मंत्र्याच्या सोबत आपण त्यांना पाठवले... आम्हाला यातुन सोडव. '
या सर्व प्रकाराला कणखर पणा म्हणता येत नाही.
<< येनकेनप्रकारेण सरकारला शिव्या घालण्यासाठीचा आणखीन एक केविलवाणा प्रयत्न यापलिकडे काही अर्थ नाही. >>
------- कणखर नाही आहे असे म्हणणे म्हणजे शिवी ठरत नाही. कंदाहार मधे आपण कच खाल्ली हे मीच म्हणतो आहे असे नाही, सर्व सामान्य भाजपाचे पण अगदी असेच मत आहे, फक्त सार्वजनिक रित्या ते तसे मान्य करत नाही.
हे सगळं आता २०१९ मध्ये लिहून
हे सगळं आता २०१९ मध्ये लिहून काय उपयोग आहे? जेव्हा ते अपहरण घडत होतं तेव्हा "खबरदार अतिरेक्यांना सोडाल तर, आम्ही जसं म्हात्रेना बळी जाऊ दिलं तसंच तुम्ही या ओलिसांचं केलं पाहिजे, काही का होईना त्या शेकडो लोकांचं" असं काँग्रेसने अटलजींना का ठणकावून सांगितलं नाही? तेव्हा बोलले असते तर काही अर्थ होता.
काँग्रेसने त्या भिंद्रनवालेचं पालनपोषण करून त्याला मोठा केला. पुढे तो काँग्रेसवर उलटला मग त्यातून ऑपरेशन ब्लू स्टार वगैरे झालं. खलिस्तानी अतिरेक्यांनी १९८५ मध्ये एअर इंडियाचं कनिष्क नावाचं विमान उडवून दिलं त्यात ३५० लोक मरण पावले. स्वतः निर्माण केलेल्या प्रॉब्लेममधून ३५० लोक मरण पावले तरी त्याचं अज्जिबात ओझं वाटू न घेणे हे फक्त काँग्रेसच करू जाणे. !
खलिस्तानी अतिरेक्यांनी १९८५
खलिस्तानी अतिरेक्यांनी १९८५ मध्ये एअर इंडियाचं कनिष्क नावाचं विमान उडवून दिलं त्यात ३५० लोक मरण पावले. स्वतः निर्माण केलेल्या प्रॉब्लेममधून ३५० लोक मरण पावले तरी त्याचं अज्जिबात ओझं वाटू न घेणे हे फक्त काँग्रेसच करू जाणे. !>>>>> एवढेच नाही. त्या भोपाळ वायु कांडात अगणित लोक मेले, कित्येक जण अजून त्याची सजा भोगतायत, कित्येकांच्या पिढ्यांवर त्याचा परीणाम झाला, तरी आमच्या माजी पंतप्रधानांनी त्या खूनी ( या घटनेस जबाबदार ) अॅडरसनला भारताबाहेर पळुन जाण्यात मदत केली. अर्जुन सिंग हे मदतनीस.
९३ च्या खटल्यावेळी दाऊदची आई व बहीण यांना कोणी मदत केली पासपोर्ट मिळवुन देण्यात? खरे तर कित्येक असे प्रश्न आहेत. जे दोन्ही पक्षांनी निर्माण केले, उगाच तू तू मै मै करण्यात अर्थ नाही. या देशाला स्व. इंदिरा गांधी सोडल्या तर एवढे कणखर नेतृत्व परत मिळाले नाही. मोदी आहेत कणखर पण त्यांना पुढे किती वाव मिळेल माहीत नाही.
इंदिरा गांधी व पुतिन यांच्यासारखे खंबीर होऊन लढणे येर्या गबाळ्याचे काम नाही.
सनव on 20 February, 2019 - 04
सनव on 20 February, 2019 - 04:08>>
होय होय सावकाश, इतका त्रागा का म्हणून? आता वरच्या प्रतिसादात तुम्हीचं लिहलेले शांतपणे पुन्हा एकदा वाचा बरं.
इंदिरा गांधी व पुतिन
इंदिरा गांधी व पुतिन यांच्यासारखे खंबीर होऊन लढणे येर्या गबाळ्याचे काम नाही.>>
म्हणून मोदीलाच मत द्या हे झापडेपणाने सांगणे आहे.
म्हणून मोदीलाच मत द्या हे
म्हणून मोदीलाच मत द्या हे झापडेपणाने सांगणे आहे.>>>>>>
मी कितीही उड्या मारल्या की मोदींनाच मत द्या म्हणून तर तुम्ही देणार आहात का? नाही ना? झाले तर मग !
रच्याकने, मी मात्र मोदीनांच
रच्याकने, मी मात्र मोदीनांच मत देणारे, मग जग इकडचे तिकडे का होईना. राहुल, ममता, मायावती, अखिलेश, लल्लन बिटवा, अजाण राजा, नायडु यांना पी एम चे दावेदार म्हणून बघुच शकत नाही. उरल्या सोनिया व प्रियंका तसेच नितीशकुमार हे एकवेळ काहीतरी दमाचे आहेत. सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना परत पी एम बनु देतील असे वाटत नाही. मग उरलं कोण?
उरले कोण ? हे सांगून /
उरले कोण ? हे सांगून / विचारून मोदीना मत देणे, म्हणजे मोदींनी विकास केला नाही, हे मान्य करणे.
<< इंदिरा गांधी व पुतिन
<< इंदिरा गांधी व पुतिन यांच्यासारखे खंबीर होऊन लढणे येर्या गबाळ्याचे काम नाही. >>
-------- इंदिरा गांधी अगदीच सहमत. १९७१ मधे पाकचे दोन तुकडे करुन दाखवले. खंबिर नेतृत्वाच्या जोडीला खुप मोठा मुत्सद्दीपणा... अमेरिकनसही हात चोळत बसले.
पुतिन पाताळयंत्री आहे. विरोधकांना जिवानेच मारतो. कुठलाही भरवसा नाही. अमेरिक अध्यक्षाला ट्रम्पला मुठीत बंद केले आहे.
मोदी यांना कणखर म्हणायचे तर हरदनहल्ली डोडेगौडा देवगौडा ही वाईट नाही.
लोकशाहीत आपापले आमदार खासदार
लोकशाहीत आपापले आमदार खासदार निवडून द्यायचे असतात, मग ते ठरवतात , कोण अध्यक्ष ते
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/H._D._Deve_Gowda
हा पर्याय कसा वाटतो ?
भारताला आज तरुण तड़फदार
भारताला आज तरुण तड़फदार नेतृत्वाची जास्त गरज आहे आणि ह्यासाठी एकच सक्षम नाव येऊ शकते ...
देवेगौडा ????? उदय आर यु
देवेगौडा ????? उदय आर यु सिरीयस? सदनात ते झोपले तर उठी उठी गोपाळाच करावे लागेल.
बरं, सगळे जाऊ द्या. माझे जुनेच रडगाणे मी परत लावते. आपल्या देशाला किमान ५ वर्षासाठी मिलीटरी शासन लावा. म्हणजे दंगेखोरांची पण रट्टे खायची हौस भागेल.
मिलीटरीवाले जाम हाणतात. ( आम्ही रेल्वेत बघीतलेय ते, नाहीतर म्हणाल स्वानुभव सांगता का? )
Pages