भाग्यवान

Submitted by Asu on 14 February, 2019 - 09:15

आज 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी माझ्या कवितांवर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांमुळे माझ्या ‘असुच्या कविता’ या एफ बी पेजचे पाचशे लाईक्स झाले.
त्यानिमित्त माझ्या कवितांच्या सर्व व्हॅलेंटाईन्सना प्रेमपूर्वक -

भाग्यवान !

पंचशतकी ‘लाईक्स’ झाले
‘असुच्या कविता’ पेजचे
आभार तुमचे मानू किती
मोती जमविले रोजचे

कान डोळे सदा उघडे
नाही केले तोंड बंद
अन्याय अत्याचारावर
ओढले कोरडे बेधुंद

दगडांमध्ये देव नाही
माणसात मी देव पाही
माणुसकी हा धर्म माझा
माणसांसाठी जन्म घेई

कुणा रुचले, कुणा न पटले
मतमतांतरे मान्य सगळे
पटला तर विचार घ्यावा
ना तर तसाच सोडून द्यावा

कविता केल्या छंद म्हणुनि
दिल्या तुम्हां मकरंद जाणुनि
प्रेमे स्वाद तुम्ही चाखावा
तोषून मज आशिष द्यावा

करीन कविता तुमच्यासाठी
हात असू द्या असुच्या पाठी
लाईक्स-गंगा निरंतर वाही
नको जीवनी अजून काही

कवितेचे अनंत कुटुंब माझे
असेच वाढो, भिडो गगनी
कविता माझी श्वास वाहिनी
भाग्य याहुनि काय जीवनी!

- प्रा. अरुण सु. पाटील ( असु)
(दि. 14.02.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults