सानी तर जमला आहे, जमणार उला

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 February, 2019 - 01:05

ह्या विश्वाचा साधत होता तोल जिला
समजत होतो आपण मातीमोल तिला

ह्यासाठी प्रेमात तुझ्या मी राधेया
जिवापाड पाळलास तू जो शब्द दिला

ज्याच्यासाठी रक्ताचे परके केले
परक्या हाती पडला आहे तोच व्हिला

नशा उतरल्यावर आता म्हणतो आहे
चढली होती, चवथा पेग उगाच पिला

आयुष्याची हाफ सेंच्युरी तर झाली !
(सानी तर जमला आहे, जमणार उला)

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users