प्रश्न ....? जॉर्ज मार्टिनचं गेम ऑफ थ्रोन्स किंवा स्टीफन किंगच्या कादंबऱ्या मराठीत अनुवादित का होत नाहीत

Submitted by शुभम् on 12 February, 2019 - 10:35

जॉर्ज आर आर मार्टिन यांची सोंग ऑफ आईस अंड फायर ही पुस्तकांची सिरीज किंवा स्टीफन किंगच्या सत्तरच्या वर असणार्‍या कादंबऱ्या मराठीत उपलब्ध का नाहीत.....?

फॅण्टसी fantasy या साहित्य प्रकाराला मराठीत काय नाव आहे....?

जी आर आर टॉल्कीन , जॉर्ज आर आर मार्टिन या लेखकांंसारखं मराठीत कोणी फॅन्टसी लेखन केलेलं आहे का.......?
मला जास्त माहित नाही नारायण धारप रत्नाकर मतकरी आणि जुन्या वीरधवल सारख्या आणि दातार शास्त्रींच्या कादंबऱ्या सोडल्या तर......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Fantasy stories ह्या शब्दाचा चा "स्वैर" अनुवाद मी "परी-कथा" असा करेन.

तसं पाहिलं, तर कल्पनाशक्ती आपल्या मराठी लेखकांमध्ये काही कमी नाही, पण... आपल्याकडे, परी-कथा आणि बाल-साहित्य ह्यामध्ये थोडीशी गफलत होते. एक पुसटशी रेषा आहे दोनही प्रकारामध्ये...

सुमारे वीस-एक वर्षांपूर्वी आपल्या इथेही "कल्पना-विलास" यावर आधारीत असणाऱ्या कथांचा एक वाचक 'वर्ग' हळू हळू तयार येऊ लागला...आणि त्याच बरोबर, सुदैवाने, लेखकही 'परी-कथा' ह्या साहित्य प्रकार हाताळण्यासाठी प्रेरित होऊ लागले...त्या 'हॅरी पॉटर' चिच जादू म्हणायची दुसरं काय?!...
मी एक impulsive वाचक आहे आणि म्हणूनच, सध्याच्या काळात, कुठल्या मराठी लेखकाने ह्या 'परी/कल्पनाविलास' कथाप्रकारात कितपत मजल मारली आहे हे मला खरंच माहित नाही. पण एक नक्की, सुरवात झाली आहे. आपल्या मायबोलीवरच तीन-चार Fantasy कथानकं मी वाचली आहेत...काही कथा वाचल्यावर हॅरी पॉटरचेच प्रसंग, परत, फक्त नावं बदलून मराठीत लिहिले आहेत कि काय असं वाटतं. परंतु हे होणं अगदी स्वाभाविक आहे कारण मघाशीच म्हणाल्या प्रमाणे आपल्याकडे हि सुरुवात आहे...कृपया त्या कथांच्या लेखकांनी माझ्या ह्या अभिप्रायाचा गैर-अर्थ काढू नये. त्यांचा प्रयत्न अतिशय स्तुत्त्यच आहे...

कल्पनाविलास लिहिणे काही सोपी 'गोष्ट' नाही...
पाश्चात्य लेखकांशी तुलना करू... अम्म्मम्म्म्म... Cinderella अथवा Snow-White ह्या गोष्टी आपल्याला जितक्या निरागस माहित आहेत, त्या तितक्या निरागस नाहीत... Brothers Grimm चे मूळ कथानक अतिशय bold आणि dark आहेत. तीच परिस्थिती Arabian Nights ची...
परी-कथेची मांडणी सर्वात महत्वाची! कथा एखाद्या मध्यवर्ती सूत्राभोवती फिरते आहे का?... मग,त्यानुषंगाने येणाऱ्या प्रत्येक पात्राचे (हि पात्रे सुद्धा उगाच, फोडणीला मोहरी म्हणून टाकली जात नाहीयेत ना?) स्वतंत्र अस्तित्व आहे का?, त्याला इतिहास आहे? आणि कथेमध्ये त्याचे भविष्य काय असेल व त्याच्यामुळे कथेचे भविष्य काय होईल अशा प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर विचार हवा... खोटं लिहिता लिहिता, खऱ्याला छेद देता आला पाहिजे (Narnia पाहिल्यानंतर सगळ्यांना मजे-मजेतच का होईना पण वाटलच असेल कि आपल्याही वॉर्डरोब ला मागून एखादा अदृश्य दरवाजा असेल तर.. हीच गम्मत आहे)... संवाद सहज अन अर्थपूर्ण हवेत... कथा भावपूर्ण हवी.

थोडक्यात काय, 'जादूची अंगठी', 'जादूची पेटी', 'जादूच्या उडत्या पादुका' अशा अनेक कथा आपण लहानपणी वाचल्या आहेत (ज्योत्सना प्रकाशन, अनमोल प्रकाशन ई. यांची ती छोटी-छोटी पुस्तक राहून-राहून माझ्या डोळ्यांसमोर येतायत...काय छान होते ते दिवस...) आपण ह्या कथा वाचता-वाचता मोठे झालो, आणि जेंव्हा ह्याही कथा मोठ्या होतील तेंव्हा आपण म्हणू शकू कि आपल्याकडेसुद्धा तीतक्याच ताकदीचे परी-कथा साहित्य उपलब्ध आहे...

इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो आपल्या मायबोली वरच्याच लाडक्या लेखकाचा... "मिरिंडा"... अद्भुत कल्पनाविलास असलेली, साहस, चमत्कार , शृंगार आणि प्रणय अशा विविध रसांनी परी-पूर्ण असलेली "संतराम" हि त्यांची कथा वाचली नसेल, तर नक्की वाचा... दुःख एवढच , कि ती कथा ते अजून पूर्ण करू शकलेले नाहीत... पण काही हरकत नाही, वर म्हंटल्याप्रमाणे, "हि फक्त सुरुवात आहे"...

धन्यवाद!

ता.जा.क.
"मिरिंडा, तुमच्या कुटुंबात घडलेल्या अतिशय दुःखद प्रसंगातून बाहेर येण्याची शक्ती तुम्हा सर्वांस परमेश्वर नक्की देत आहे ह्यात शंका नाही...

'संतराम', 'चिरुमाला' अशा अनेक कथानकाच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत...
अपूर्व जांभेकर.

Game of thrones , lord of the ring आणि hobbit यासरख्या fantasy ना परिकथा संबोधनं बरोबर होणार नाही . परीकथा म्हणलं की आठवते ती सोनपरी.......
फॅन्टसी म्हणजे कल्पनाविलास मग तो कोणत्याही बाबतीत का असेना त्याला परीकथा म्हणने योग्य होत नाही....

50 शेडस चा अनुवाद मराठीत वाचणे ही शिक्षाच असेल
मुळात मराठी मध्ये शृंगार हा तलम असेल तरच वाचवतो नाहीतर अवघड
कोपर ढोपर पिंढरी पोटरी असली अवयवांची नावे असताना त्यात शृंगार कसा बरे उभा करावा लेखकाने

Pages