जलयुक्त शिवार

Submitted by Asu on 11 February, 2019 - 01:40

जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवार योजना मस्त
करण्यास राज्य दुष्काळमुक्त
पाणी अडवून, पाणी जिरवून
नद्यानाले तळी करू जलयुक्त

शेतकरी मनी बहु आनंदला
दिवस सुगीचे बघू लागला
शिवार माझे होईल हिरवे
दिवस बहुधा येतील बरवे

हजारो कोटी खर्च जाहले
पाण्यासम मुक्त वाहले
विकास होईल नेते वदले
शुक्राचार्य झारीत हसले

पाण्यासारखा पैसा ओतला
कोरड्या पाटी वाहून गेला
ठेकेदार परि चिंब भिजले
पाणी सगळे तिथेच मुरले

जलयुक्त शिवार गाजावाजा
वाजला त्याचा बेंडबाजा
योजना आखण्या आम्ही राजा
अंमल करण्यां मजाच मजा !

भूजल सर्वेक्षण तज्ञ भोळसट
वाटे, करती उगाच वटवट
भूजलात म्हणे झाली घट !
माध्यमांनी जणू रचला कट

योजनानिधी सर्व उधळता
नद्यानाले तळी झाले जलमुक्त
एकच निश्चित झाले फक्त
राज्य झाले बघा दुष्काळयुक्त

उघडे डोंगर, बोडके वावर
पाणी ना दिसे कुठे दूरवर
गुरं तहानली, पिकं करपली
पाण्यासाठी वणवण उरली

हवामानाचा अंदाज कसला !
शेतकरी अन त्यातच फसला
दुबार तिबार चौबार पेरणी
जुने मोडून नवनवी लावणी

दिनरात श्रमून घाम शिंपला
किती आटवलं खपून रक्त
कोंब गर्भातच सुकून गेला
माय माझी झाली शोकयुक्त

काबाड कष्ट रोज करुनी
ओंजळ माझी अखेर रिक्त
माय माझी थकली आता
आधार देवा तुझाच फक्त

अन्नदात्या ना मिळे भाकरी
तो काम मागतो दारोदारी
बळीराजा कर्जात बुडाला
व्यथा मनाची सांगी कुणाला?

- प्रा.अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कविता - वाट

माझी होती
एक वाट
थोडी सरळ
पण वळवळणाची...
वाटलं नाही चालतांना
काटेही
आणि
फाटेही असतील म्हणुन....
मी चालतच होतो
अगदी सपसप,
कुठलाच विचार
न करता अगदी एकटाच...
सोबत नाही कुणाची
म्हणुन वाट भटकलो,
चालत होतो ज्या वाटेने
तीही वाट विसरलो...
आता शोधतोय
एक नवीन वाट
जी देईल मला
सतत पुढे जाण्याची साथ...

- सचिन ज. नागरे, किनगाव जटु ता. लोणार जि. बुलढाणा मो. 9604321432

कविता - वाट

माझी होती
एक वाट
थोडी सरळ
पण वळवळणाची...
वाटलं नाही चालतांना
काटेही
आणि
फाटेही असतील म्हणुन....
मी चालतच होतो
अगदी सपसप,
कुठलाच विचार
न करता अगदी एकटाच...
सोबत नाही कुणाची
म्हणुन वाट भटकलो,
चालत होतो ज्या वाटेने
तीही वाट विसरलो...
आता शोधतोय
एक नवीन वाट
जी देईल मला
सतत पुढे जाण्याची साथ...

- सचिन ज. नागरे, किनगाव जटु ता. लोणार जि. बुलढाणा मो. 9604321432