वेळ आमावस्या

Submitted by RAM NAKHATE on 8 February, 2019 - 02:26

अमावस्या हा दिवस भुत प्रेतांचा समजला जातो. अमासेचा अंधार आपल्या जिवनात किंवा सुखी संपन्न व्यवसाय,घर व इतरत्र कार्यात पडु नये यासाठी अमावसेला विविध देवांची पुर्जा अर्चा केली जाते. वर्षातन 12 अमावस्या येतात त्यात एक वेळ अमावस्या या नावाची अमावस्या असते, जी की शेतक-यांसाठी महत्त्वाची असते. म्हणजे वेळ अमावसेला शेतकरी आपल्या शेताची पुजा करतो. वेळ अमावस्या मराठवाडयात लातुर,उस्मानाबाद आणि नांदेड,बीड मध्ये हा सन आनंदाने साजरा करतात.
ही अमावस्या म्हणजे ‘‘वेळ अमावस्या‘‘ येळ अमोश्या, एलामा असे स्थानिक जुना अपभ्रंस झालेला शब्द. अतिशय आनंदाने साजरा होणारा सन याचे मुळ नाव ‘येळी अमावस्या‘ असुन त्याचे नामकरण ‘वेळ किंवा येळ अमावस्या‘ असे झाले. कर्नाटकात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या असते. वेळ अमावस्याला आपल्या सग्या सोय-यांना,मित्रानां अन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला घालतात.
अशा सनाला मि व माझे मित्र कर्नाटकातील एका सोनाळ या गावी प्रशांतच्या शेतात जेवणासाठी गेलो. आम्ही प्रश्नांतचे 5-6 मित्र एका गाडीवर दोगेजण अशाप्रकारे 3 मोटार सायकलने त्याच्या गावी गेलो. जातेवेळची मित्रांसोबतची मजा घेत आमचा प्रवास महाराष्ट्रतन कर्नाटकात आनंदाचा 1 तासाचा प्रवास झाला व आम्ही सर्वजण त्याच्या शेतात जेवणासाठी गेलो.
शेतात जेवायला भाकरी,भज्जी,खिर व अंबिल होते. जेवणातील महत्त्वाचे डिश म्हणजे भज्जी व अंबिल हे दोन. या जेवणारी गोडी निर्माण करणा-या भज्जी व अंबिलसह जेवण पोटर व बळजबरीने, त्यांच्या अग्रहास्तव जोरदार जेवण झाले. जेवणाची पंगत मोठी होती सर्व पंगत मित्र मंडळीची होती. प्रश्नांतच्या शेतातील जेवण ऊरकुण आम्ही निघालोच होतो. इतक्यात त्याच्या गावातील मित्रांचा गु्रप त्यांच्या शेताकडे घेऊन जात होता. एकाच्या शेतात झाल की लागलीच दुस-याच्या शेतात असा जेवणाचा कार्यक्रम होता.
जेवणासाठी आज अग्रह खुपच होता. आम्ही मित्र जेवणात एका ताटात 3-4 बसायचो तरीही सर्वांचे पोट टुल झाले होते. मी तर खुपच अंबिल पिलो होतो. अंबिल हे या सनाच अकर्षण असतं. थंडगार अंबिलची एक वेगळीच नशा असते ति नशा मला चढली होती. पण केवळ अंबिलावर हा बेत थांबलेला नव्हता. खास गावरान पदार्थ! यात विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी, या भज्जीतीली चव कोणत्याही भाजीला येत नाही. ज्वारीची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे गोड भात! खरिपाती केवळ तुरीची रासच बाकी होती.
काही जणाच्या शेतात उस,कोवळया हरब-याचे डहाळे, बटाण्यांच्या शेंगा इत्यादी पदार्थही ताजे ताजे खाण्यासाठी भेटत होते. त्यातील उसाची गोडी मी न घेता सोडलीच नाही. कारण किर ऊन्हाची तिव्रता नव्हती पण थोडीशी थंडी आणि ऊन्हांचा चटका जाणवत होता. आणि उसाचे गाळप सुरू होणयाची वेळ होती म्हणुन ऊस खाण्याची माझी हौस भागवता आली. ऊस खाण्यातली मजा वेगळीच आहे उसाचा बेत हो जिभेला चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरिराला ऊर्जाही मिळवुन देतो. अशाप्रकारे सर्वांचे खाणपाण अटोपुण निघालो.
गावातन बाहेर निघण्यात एकाने रूकावट खातली व एका छोटयाशा टपरिवर सोडा पिण्यासाठी त्याला नाही म्हणता आले नाही. सोड पिल्याने अन्नाचे पचन होते आणि पोटात गाॅस होत नाही. म्हणुन सर्वानी सोडा पिला व शेवटचा एक कार्यक्रम सध्या जगात गाजलेला तो राहीलाचं नां! एकाने आवाज दिला. सर्वजण गाडया थांबवा सेल्फी घ्यायची आहे....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वर्षी माझ्या टीम मेट ने लातुरहुन येताना 'हेळामुशा' चा जेवणाचा डब्बा आणला होता. बाजरीची भाकरी, धपाटे आणि हरभरे, तुरी,वाटाणे हे सर्व पिठलं करतानाच त्यात शिजवलेली लज्जतदार भाजी आणली होती. मी पोटभर खाल्ली. या वर्षी मात्र नाही मिळायची.. आता मी दुसर्‍या ठीकाणी काम करतो.