कोन मारी मेथड. आवरा तो पसारा!!

Submitted by अश्विनीमामी on 5 February, 2019 - 01:06

आपल्या घरात आपल्याही नकळत वस्तू जमा होत जातात. मुले आली की त्यांच्याबरोबर पसारा पण निर्माण होत जातो. बाबा जिमला न जाता घरीच ट्रेडमिल वर चालू ठरवतात. आई स्वयंपाकघरातील प्रत्येक गरजे साठी नव नवे मशीन्स घेत जाते. आयपी कुकर किमान पाच साइज मधले.
बारका, छोटा, नॉर्मल युएस्बी वर चालणारा, इंडस्ट्रिअल पावरचा फूड प्रोसेसर, मिक्सर ज्युसर, सूप मेकर, करंजीचे साचे, सोर्‍या , प्रत्येक मुलाचे किमान १०० कपडे आईच्या साड्या, भारतीय व परदेशी पद्धतीचे कपडे, बाबांचे फॉर्मल्स व कॅजुअल्स, व प्रत्येकी १० -११ प्रकारचे शूज.
झोपाळे, सोफे, बीन बॅग, खेळणी लेगोच्या ब्रिक्स हर सणाचे डेकोरेशन हे नीट साठवलेले प्रत्येक वर्शीचे,

काही जुन्या आठवणीतील वस्तू, आईची पैठणी, बाबांची ब्रीफकेस, आत्याचे गणेश मूर्तींचे कलेक्षन, बारक्यांचे प्रॉजेक्ट्स, वस्तू कपडे आणि अजून जास्त वस्तू ह्यांच्या पसार्‍यात आणि अडगळीत कधी कधी हरवून जायला होते . आपण नक्की काय करतो आहोत ह्यावरचा फोकस निघून जातो व ही अडगळ नातेसंबंधात पण परा व र्तित होते. हा सर्व कचरा पसारा साफ करणे अगदी गरजेचे आहे.

हे मी म्हणत नाही तर मारी काँडो. सुप्रसिद्ध जपानी प्रोफेशनल स्पेस ऑर्गनायझर व डिक्लटर स्पेशालिस्ट म्हण ते. ह्या ताईंची ब्रांडेड व बहुतेक
पेटंटेड मेथड म्हणजे कोनमारी.

सर्व कपाटे खण, ड्रावर फडताळे रिकामी करा, जरुरीपुरतेच ठेवा व बाकीचे देउन टाका नाहीतर टाकून द्या. असे ताई म्हणतात बहुतेक.
कारण त्या जपानीत बोलतात. व अडगळ / पसारा दिसला कि शिव शिव करत चक्कर आल्याचा अभिनय करतात. पण मग घर आवरायला मदत करतात.

नेटफ्लिक्स वर कोनमारी, मेरी कांडो ची काही भागांची मालिका उपलब्ध आहे. मी दोन भाग बघून सोडून दिले. काय तो पसारा? बघवेना. पण घर आवरल्यावर दिसते मात्र छान.

मग भगिनिन्नो व बंधुंनो काय घेतायना घर आवरायला?!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक देशातला साठ टक्के किंवा अधिक भाग, जीवन दाखवले जात नाही.
घरातच कपडे धुवून वाळवले जात नसतील तर कुठे वाळवतात तिकडचे सामान्य लोक? तो पसारा आवरायचा म्हणजे काय करायचं?
एक सॅास, फक्त एक प्रकारचे कडधान्य ( बीन्स), एक धान्य (गहू) एवढ्यावरच भारतात अन्न केलं जात नाही.
लोणची,पापड,बारा कडधान्ये,चार धान्ये ,पंचवीस मसाले वापरतात इकडे.

अमा Happy

सगळे घर तर सोडाच, पण येणारी बिल्स, मार्केटिंग ब्रोशर्स, अ‍ॅड्स, ऑफर्स ई बद्दल एक सिस्टीम तयार करून त्याप्रमाणे वेळच्या वेळी क्लिअर करणे ही माझी महत्त्वाकांक्षा आहे. आजपर्यंत जमलेले नाही. मग कधीतरी वीकेण्डला फ्रेण्डस लावून तो गठ्ठा काढतो. त्यातून एक उपगठ्ठा थेट फेकून द्यायच्या गोष्टींचा, एक श्रेड करण्याचा, एक त्यावर काहीतरी अ‍ॅक्शन घेणे बाकी आहे असा, एक डॉक्युमेण्ट्स जी आपण वर्षानुवर्षे ठेवून देतो त्याचा. हे त्या एका वेळेस बरोबर होते. पण नंतर पुन्हा पहिल्यासारखी चळत जमा होत जाते.

कधीकधी हवी ती महत्त्वाची डॉक्युमेण्ट्स सापडत नाहीत, आणि "हे एकदा क्लीन करायला हवे" मोड वर परत येतो.

आता एवढे सगळे पसाराग्रस्त, होर्डर्स आहेत तर किमान एकतरी मिनीमलिस्टिक, ओसीडीग्रस्त सापडायला हवा Wink

तीन म्हाताऱ्या http://aisiakshare.com/node/2204

पसारा आवरणे एक अंधश्रद्धा http://aisiakshare.com/node/2731

>>पण येणारी बिल्स, मार्केटिंग ब्रोशर्स, अ‍ॅड्स, ऑफर्स ई बद्दल एक सिस्टीम तयार करून त्याप्रमाणे वेळच्या वेळी क्लिअर करणे ही माझी महत्त्वाकांक्षा आहे. आजपर्यंत जमलेले नाही.<<

इट्स सुपर इझि. सगळी बिलं पेपरलेस करा. ऑनलाइन अ‍ॅक्सेस, अ‍ॅप्स, अ‍ॅलर्ट्समुळे बिलं मिस व्हायची शक्यता शून्य. क्रेडिट कार्ड्स, युटिलिटी, टेलिफोन/टिवी/इंटरनेट वगैरे ऑटो पेमेंट सेट करणे हा दुसरा उपाय. या व्यतिरिक्त जो कचरा (जंकमेल) घरी येतो, तो हि इथे साइनअप करुन थांबवु शकता. आणि शेवटी, युएसपिएस ची एक सेवा आहे, इन्फॉर्म्ड डिलिवरी म्हणुन. साइनअप फॉर दॅट. एव्हरी मॉर्निंग दे सेंड यु ए नोटिफिकेशन (सॉर्ट ऑफ स्नॅपशॉट) व्हॉट इज कमिंग टु योर मेल्बॉक्स. अशी पुर्वसूचना मिळाली कि संध्याकाळी मेल पिकप केल्यावर ठरवता येतं कि थप्पीतुन काय निवडायचं आणि काय ताबडतोब रिसायकल बिनमध्ये टाकायचं...

घरी पसारा असणार्‍यांसाठी एक उपयुक्त सूचना:

घरी देवतारी आणून ठेवा. ज्याच्याकडे देवतारी असते त्याच्याकडे कोनमारी आपोआपच येते.

सूचना समाप्त!

पसारा आवरण्याचे, शिस्त टापटीप राखण्याचे झटके अधुन मधुन येत असतात. परंतु ते कोणत्याही उपचाराशिवाय बरे होतात असा अनुभव आहे. माझ्यातली शिस्त बायकोने हळुहळू संवेदनाहीन केली आहे. पेन जागेवर न सापडणे या साठी मी फोनजवळ दोरीला पेन लावून ठेवण्याचे प्रयोग केले पण ते फेल गेले. पेन व टोपण. दोन मोजे, डबा व झाकण. बाटली व बूच यांचे असोसिएशन राखण्याचे प्रयोग देखील फेल गेले. बर हे असोसिएशन राखण्यासाठी मी सुचवलेले उपाय काही अव्यवहार्य नव्हते. उदा. पेन वापरताना टोपण पेनला लावूनच ठेवावे. दोन मोजे एकमेकांना फुली गाठ करुन ठेवावे. डबा व झाकण हे एकमेकांजवळच ठेवावे व काम झाल्यावर परत लावावे. बेसीन जवळचा नॅपकीन हा धुवायला टाकायच्या अगोदर त्या जागी धुतलेला नॅपकीन लावावा मगचे तो धुवायला टाकावा. फोनचे चार्जिंग झाल्यावर फोन काढताना बटण बंद करावे.....
हल्ली मला हा त्रास होत नाही कारण माझी जगण्यातील विरक्ती वाढत चालली आहे. बाकी तुम्ही काहीही करा माझ्या वस्तुला हात लावू नका म्हणजे झाले. अशा अलिखित सामंजस्यावर त्याचा शेवट होतो. मी वस्तू जागेवर व्यवस्थित ठेवतो त्यामुळे कात्री, स्टेपलर, पेन, स्क्रू ड्रायवर, फेवीस्टिक...इ चे तीन तीन सेट करुन देखील त्यांना वेळेवर सापडत नाही. मग घाईच्या वेळी माझ्या वस्तू वेळेवर व जागेवर सापडतात त्यामुळे त्यावर डल्ला मारला जातो. मग माझ्या गरजेच्या वेळी त्या गायब झालेल्या असतात. मग चिडचिड होते. असो जगण हीच एक समृद्ध अडगळ आहे अशी दृष्टी ठेवली की जगताना त्रास होत नाही.

माझा एक सामान्य नियम आहे.
ज्या वस्तू एक - दोन वर्षे लागल्या नाहित त्या (भावनिक गुंतवणूक) नसेल तर डोळे झाकून फेकून द्याव्यात.

कपडे जपून जपून वापरू नयेत .... गुधडून खराब करून टाकून द्यावेत.
महागडी क्रोकरी रोजच्या वापरात ठेवावी - शोकेसमधे नाही.. वस्तू भरपूर वापरून खराब करून - फुटून- मोडून द्याव्यात म्हणजे आपोआप घराबाहेर जातात.

प्रकाश घाटपांडेच्या प्रतिसादाशी सहमत. स्वतःला वस्तु जागच्या जागी ठेवण्ञाची सवय असली की दुसर्याला तसे न करताना पाहुन, वस्तु घेउन वापरुन जागेवर न ठेवल्यामुळे पुढच्या वेळी मिळाली नाही की चिडचिड होतेच.

ज्या वस्तू एक - दोन वर्षे लागल्या नाहित त्या (भावनिक गुंतवणूक) नसेल तर डोळे झाकून फेकून द्याव्यात.>>>>>> असं केलं तर अर्ध्यापेक्षा जास्त घर रिकामे होईल.

कुटुंबियांच्या अव्यवस्थित पणामुळे त्याना वस्तू घाइच्यावेळी सापडल्या नाहीत कि आपल्या वस्तूंवर डल्ला पडतो , क्षणभर आपली चिडचिड होते. पण मग आपले प्रेम असल्याने त्याना आपण नकळत उपयोगी पडल्याचे एक सूप्त समाधानही सुखावून जाते...

पण मग आपले प्रेम असल्याने त्याना आपण नकळत उपयोगी पडल्याचे एक सूप्त समाधानही सुखावून जाते..>>> म्हणजे पुलंच्या नारायण ने ऐनवेळी पंचांग काढून समयोचित उपयुक्ततेच समाधान मिळवल्यासारखे ना?

घर आवरलं की मला वस्तू मिळेनाश्या होतात Happy व्यवस्थित आवरलेल्या कपाटात डोळ्यासमोर ठेवलेली वस्तू मला कधीही दिसत नाही Happy आजकाल मी एखादी गोष्ट खूप सांभाळून ठेवताना सगळ्यांना आरडाओरडा करुन कुठे खूप सांभाळून ठेवली आहे ते सांगते Happy स्वयंपाकघरात मला कधीही कोणतीही वस्तू मिळते आणि चमचे, डबे ग्लास, overall भांडी नकळत मनातल्या मनात मोजदाद असते Happy एखादी डबी, चमचा दोन दिवस दिसलं नाही की मी सगळ्यांना प्रेमाने विचारते की कोणी हरवून आलंय का? Happy

व्यवस्थित आवरलेल्या कपाटात डोळ्यासमोर ठेवलेली वस्तू मला कधीही दिसत नाही> >>>> सिरीयसली? Happy
घरात मी सोडुन बाकी मेम्ब्रांना आहे ही बीमारी. अगदी डोळ्यसमोर असलेली वस्तुही दिसत नाही. मिळत नाही त्यांना. जी वस्तु मी अगदी शुन्य ते अर्ध्या मिनिटात काढते. त्याच कपाटातुन/ड्रॉवरमधुन.

घर आवरलं की मला वस्तू मिळेनाश्या होतात .. व्यवस्थित आवरलेल्या कपाटात डोळ्यासमोर ठेवलेली वस्तू मला कधीही दिसत नाही Happy+१११११११११११११११११११११११११११११
सेम हीअर
बेसिक घर आवरलेलं असतं, समोर पसारा दिसु नये एव्ढच...
किचन मध्ये मात्र मला सगळ सामान जागच्या जागी लागतं आणि ते ठेवल्या ही जातं

पसरलेल्या घराची किंवा अव्यवस्थित पणाची भलावण ही एक फॅशन झाली आहे...

आता येणार माझ्यावर शाब्दिक हल्ले....

मी महत्वाची आहे. माझ्यासाठी घर आहे, घरासाठी मी नाही. प्रत्येकजण स्वतःच्या परीने उत्तम प्रयत्न करतच असतो, अशी माझी धारणा आहे.

ज्या वस्तू एक - दोन वर्षे लागल्या नाहित त्या (भावनिक गुंतवणूक) नसेल तर डोळे झाकून फेकून द्याव्यात.>>> हे काही माझ्याच्याने होणार नाही. Happy
एक - दोन वर्षे लागल्या नाहित अशा कित्येक गोष्टी असतात घरात. त्या फेकुन देउ शकत नाही.
तीन खोल्यांचं घर आहे. सामानही भरपुर आहे पण अस्तव्यस्त नाहीये. पसारा नाहीये. नीटनेटकं आहे. मला जराजरा ओसीडी असल्याने असेल Happy पण बरेचदा कपडे, कपाट मी नीट लावते. माझ्या चिडण्याला घाबरुन म्हणा किंवा काही, पण बाकी मेम्ब्रं पण कपाट/ ड्रॉवर नीट राखायचा आटोकाट प्रयत्न करतात Happy

स्वच्छ आवरलेले घर, कपडे, भांडी, पुस्तके नीटनेटके लावलेली कपाटे, जागच्याजागी ठेवलेल्या वस्तू वगैरे वगैरे हे सगळे एकाच वेळी एकाच घरात अस्तित्वात असणे हे माझे आजवर कधीही पुरे न झालेले स्वप्न आहे. माझ्या घरातल्यांची व माझी शिस्तीच्या बाबतीतली आस्था लक्षात घेता हे स्वप्न पुरे व्हायला पुढचा जन्म गाठावा लागणार हे केव्हाच माझ्या लक्षात आलेले आहे.

पण तरीही आता पसारा खूपच झालाय हे वरचेवर लक्षात येऊन खूप खिन्न वाटते. कित्येकवेळा मनावर दगड ठेऊन नको असलेल्या गोष्टी बाहेर काढायला कंबर कसून बसते आणि स्मरणरंजनात रमून सगळे विसरते.

घर आवरलं की मला वस्तू मिळेनाश्या होतात Happy व्यवस्थित आवरलेल्या कपाटात डोळ्यासमोर ठेवलेली वस्तू मला कधीही दिसत नाही >>>>>>>> + १११११११११११११११
आजकाल मी एखादी गोष्ट खूप सांभाळून ठेवताना सगळ्यांना आरडाओरडा करुन कुठे खूप सांभाळून ठेवली आहे ते सांगते Happy >>>>>> फक्त तेवढ्याकरिता अलेक्सा आणाविशी वाटतेय.
प्रकाश घाटपांडेंशी सहमत.
बेताच्या परिस्थितीत आम्ही वाढलेय व तेच संस्कार झालेत त्यामुळे उगीचच हव्यासापोटी काही घ्यावसं वाटलंच नाही तरी बराच पसारा जमा झाला.आताच नागपूरच्या घरातलं तिकडे जायच्या आधी कमी केलं. आता घर रंगवायला काढलंय तर अजून कमी करीनच. पुण्यातल्या घरात अगदी चार माणसं देन आम्ही व दोन पाहुणे एवढंच सामान आहे. आम्ही इथे नसताना नागपूरच्या घरी काही कामाने राह्यली. ती दोन चादरी भेट म्हणून ठेवून गेली. त्या चादरी बघून प्रचंड चिडचिड झाली. फोनच नाही केला. काल तिचा फोन आला सांगायला की आमच्या काॅमन मित्राच्या मुलाच्या लग्नाला येतेय. हाॅटेलात रहा सांगन बरंच काही तीला बोलले . तिला माहितीये चांगलं की मी वानप्रस्थाश्रम घेतलाय काहिही देत घेत नाही. तरी का द्यावं ना ! हेच एका नुकतच जवळच्या नातेवाईकानेही केलंय पण मी आता ठाम रहायला शिकलेय.

आमच्याकडे >>कात्री, स्टेपलर, पेन, स्क्रू ड्रायवर, फेवीस्टिक...इ चा >>एकच डबा आहे. Only one set,at one place.
वापराचा नियम - फक्त स्टेपलर किंवा कात्री हवी असली तरी तो डबाच घेऊन जायचा. त्यामुळे वस्तू नेहमीच सापडते.

(( आज मराठी/इंग्रजी टॅागल बदल न करता टंकता येतय हे कसं काय झालं?))

मी महत्वाची आहे. माझ्यासाठी घर आहे, घरासाठी मी नाही.>>>>> =१.

मागे साफसफाईमधे जमा झालेल्या/न वापरलेल्या वस्तू बाईला देऊन टाकल्या.यावेळी हळदीकुंकवाच्या निमित्ताने परत काही वस्तू जमा झाल्यात.त्याही काढून टकणार आहे.सद्या नाही.जुने कपडे काढून जागा बर्‍यापैकी रिकामी केली तर नवरा परत काहीतरी त्यात भरून ठेवतो.मग ते होणारे वादंग टाळण्यासाठी मीच आता संत झाले आहे.

कपड्यांचा तर विषयच नको.
तीनेक महिन्यापुर्वी तीन जम्बो बॅग्स भरुन माझे कुर्ते-पायजामे, टीशर्ट्स, नवर्‍याचे शर्ट-पँट, मुलांचे कपडे असे टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे एका संस्थेत दिले. आता पुन्हा तेव्ह्ढेच जमा झाल्यासारखं वाटतंय.
दिल्याने वाढते असं कपड्यांच्या बाबतीत पण आहे का? Lol

आमच्यासाठी आवरा आवर म्हणजे सुरुवातीला अगदी नीटनेटकेपणा करून आणलेलं सगळं अवसान गळून सगळा पसारा घाईघाईत एकत्र करून एका कोनात (कोपऱ्यात) मारून देणे, या अर्थाने कोन-मारी आहे Happy
लॅपटॉपच्या डेस्कटॉप वर साचलेल्या कचऱ्या बाबत पण हेच धोरण आहे. एखाद्या न्यू फोल्डर नावाच्या जुन्या फोल्डर मध्ये दरवेळी डेस्कटॉप वरून काढून टाकलेला कचरा साचत जातो!

टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे एका संस्थेत दिले. >>>>> आपल्याला नेऊन द्यावे लागतात की त्यांचे कार्यकर्ते वगैरे घरी येतात?

दिल्याने वाढते असं कपड्यांच्या बाबतीत पण आहे का?>>>> Lol

घरी देवतारी आणून ठेवा. ज्याच्याकडे देवतारी असते त्याच्याकडे कोनमारी आपोआपच येते. > Lol

आणि दरवेळी आवरायला काढले की डायलॉग्ज ठरलेले.. माझं काहीही जास्त सामान नाहीये.... असं प्रत्येक सदस्याला वाटल्यावर आपण एकदम आत्मचिंतन करू लागतो.. कि मग हा पसारा कसला..

Biggrin :

Pages