गर्दीतल्या माणसा

Submitted by क्षास on 3 February, 2019 - 04:51

गर्दीतल्या माणसा,
तुझ्या-माझ्या सारख्या अनेकांचं
गर्दी हेच एक गाव आहे,
तुझं आणि माझं सध्या
'गर्दी' हेच नाव आहे

तुला आणि मला या गर्दीची गरज आहे
या गर्दीलाही माणसांची हाव आहे,
स्वतःला न ओळखणार्यांनाही इथे
स्वतःची ओळख बनवायला वाव आहे,

इथे प्रत्येकाला छोट्या-मोठ्या
प्रश्नांचा घेराव आहे,
दिशाहीन भटकत इथे मलाही
उत्तरं शोधण्याचा सराव आहे

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाट चुकलेल्या
वाटसरूचा भाव आहे,
दिशा पुसून टाकणाऱ्या या
स्वार्थी, मतलबी गर्दीचा डाव आहे

ही गर्दी माणसांची नाही
तर व्यथांचा जमाव आहे,
या माणसांच्या गर्दीत
फक्त माणुसकीचा अभाव आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही गर्दी माणसांची नाही
तर व्यथांचा जमाव आहे,
या माणसांच्या गर्दीत
फक्त माणुसकीचा अभाव आहे

भारी! अगदी अगदी!!