तु रुसलीस की

Submitted by mangesh sawant on 2 February, 2019 - 10:58

हे बरय…..
तु हसलीस की जसा चंद्र कलेकलेने वाढतोय
आणि मी हसलो म्हनजे नुसताच दात काढतोय
तु हसलीस की होते शॉपींगला जायची घाई
आणि मी हसलो की आज कीती थकले ग बाई
तु हसलीस की आणली जाते जिलेबी अन पापडी
आणि मी हसलो की देतेस हातात पिशवी कापडी
तु हसलीस की दीवस राहत नाहीत कष्टी
आणि मि हसलो की बिल विदाऊट GST
तु हसलीस की अंगात सळसळतो हाय फिवर
आणि मि हसलो की दीसतो जॉनी लिवर
तु हसलीस की जमतो रात्रभर गप्पांचा फड
आणि मी हसलो की तुझे डोळे होउ लागतात जड
तु हसताना तुझे दात म्हनजे मोती, रत्न किंवा कुंदकळ्या
आणि मी हसताना माझे दात म्हनजे वाळवी लागलेल्या लाकडाच्या फळ्या..☺️☺️☺️

पण तरीही तु हसत राहा
घरात चार मैत्रिणी जमवुन बसत राहा
हवे काही हसरे क्षण बाकी काय लागत जगायला
तुझ्या मैत्रिणींच्या निमित्ताने चार चांगले चेहरे मिळतील बघायला.
टवटवीत हिरवळ बघत जरा फ़्रेश होईल मुड….
फोडणिच्या भाताऐवजी कधीतरी खाव फास्ट फुड...
कीती काही झाल तरी मी तुझ्याशीच असेन एकनिष्ठ..
कधिही येऊ देणार नाही तुझ्या वाट्याला प्रेम उष्ठ…

शब्दांकन:- मंगेश सावंत

Group content visibility: 
Public - accessible to all site users