वृक्कखड्या रे वृक्कखड्या

Submitted by Asu on 31 January, 2019 - 22:33

२५ जानेवारी २०१९, शुक्रवार रोजी डोंबिवलीच्या दांडेकर हॉस्पिटलमध्ये माझ्यावर युरिन स्टोनसाठी शस्त्रक्रिया पार पडली. पण, तत्पूर्वीच्या किती रात्री वेदनामय झाल्या आणि त्यातून सुटका करण्यासाठीचे डॉक्टरांचे प्रयत्न यावरून सुचलेली ही कविता....

वृक्कखड्या रे वृक्कखड्या

वृक्कखड्या रे वृक्कखड्या
छळलेस किती मजला वेड्या
निघायचं तू आता गुपचूप
हात जोडितो तुला गड्या

पकडून काढी शोधून खडी
दांडेकर हा निष्णात गडी
वा घेऊन लेझर बंदूक हाती
वृक्कखड्यांची करील माती

वाहून जाशी तुला नकळत
सोडी तुझा तू चिकटपणा
अंत तुझा तू समजून घे
पुरे आता तव चावटपणा

वाचवायचे जर तुला मरण
उतरून खाली ये तू शरण
पुरे आता तव उगाच वैर
आता तुझी नाहीच खैर

आलास तू कुठून कसा
घरभेदी छुपा शत्रू जसा
आला तसाच निघून जा
नको आता तव गमजा

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि. 25.01.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

मुतखड्यावर कविता आयुष्यात पाहायचे भाग्य लाभले! वेदनेत सुद्धा कवितेची आस पकडण्याची तुमची वृत्ती आवडली

केशव तुलसीजी, मुतखड्यामुळे होणाऱ्या वेदना स्वतः अनुभवल्या शिवाय कळणार नाहीत. तरीपण, माझी दुसरी कविता 'कळा ज्या लागल्या देहा' वाचली तर त्यामुळे होणाऱ्या वेदनांचा तुम्हाला थोडाफार अंदाज येऊ शकेल.

खरे आहे, मुतखड्याच्या वेदना भयंकर. स्वतः अनुभवल्या शिवाय कळणार नाहीत. तीन दिवस इस्पितळात दाखल होतो. सतत सलाइन आणि औषधी सुरु होत्या. काही उपाय झाला नाही.

शेवटी मुतखड्यावरचे आयुर्वेदिक औषध घेतले आणि लगेच आठ दहा तासांत खडा माती होऊन बाहेर पडला. त्यानंतर आजवर काही त्रास नाही.

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि. 25.01.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
<<
पाटील सर, दांडेकर डॉक्टरांना पाठवलीत का कविता? की मी लिंक पाठवू? आवडेल त्यांना.

वृक्क म्हणजे किडनी कि गोवंशनराशी संबंधित शब्द आहे हा ?
कविता भारी मात्र. प्रेरणादायी आहे.
निरनिराळ्या व्याधींनी त्रस्त अशा रोग्यांनी वेदनेवर कविता करायला हरकत नाही.

आवडली !

वृक्क म्हणजे पुरुषाचे अंडकोश असा अर्थ माहिती आहे. किडनीला मराठी शब्द नाही किंवा मुत्रपिंड असा जुजबी शब्द आहे जो फारसा प्रचलित नाही.

कविता चांगली आहे पण त्याच बरोबर जरा यावरचे उपाय पण टाका न
तसेच या आजारात घ्यावयाची घरगुती औषधे आणि पथ्ये यावर देखील जाणकारांनी प्रकाश टाकावा

लव एन हेट रिलेशनशिप जाणवते ।. वृक्कखडा आता राहिला नसल्याने नेहेमी होते तशी पोकळी जाणवत असेल. शिवाय आता या पोकळीचं काय करायचं हा प्रश्नही ..
मुत्तखडा रे उन्मत्तखडा अशा नवीन चालीत म्हणून बघितल्यावर आणखी मजा आली. .. वृक्क थोडे अवघड आहे. पृण त्यातच कवितेची मजा हेही खरे ,,

माझ्या वेदना जाणून घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि कवितेला दाद दिल्याबद्दल धन्यवाद !
कवितेत 'दांडेकर' ऐवजी दांडीकर चुकून झाले होते. आता दुरुस्ती केली.

तुम्हाला जो त्रास भोगावा लागला त्याबद्दल पुर्ण सहानुभुती.. आता बरे असाल/ व्हाल या सदिच्छा ..
ते शिर्षकात मात्र सारख 'वृक्कखड्या रे वृक्कखड्या रे' वाचुन, ते असा गोल गोल खडा टुणकन उडी मारुन समोर येउन "हा बोला काका" म्हणतोय असं डोळ्यासमोर येत आहे..