हे राम

Submitted by DJ. on 30 January, 2019 - 07:36

आज म. गांधी यांची पुण्यतिथी. ७० वर्षांपुर्वी याच दिवशी म. गांधी यांचा नथुराम गोडसे (जो पुणे शहराचा होता) नावाच्या दहशतवाद्याने पिस्तुलातुन थेट समोरुन छातीत गोळ्या झाडुन खुन केला. खुन झाला त्यासमयी म. गांधींचे वय होते ७८ आणि अंगावर होते केवळ एक नेसलेले धोतर आणि खांद्यावर पांघरलेला एक पंचा. मरतेवेळेस म. गांधींच्या मुखातुन बाहेर पडलेले शब्द होते "हे राम..!"

एका नि:शस्त्र, अहिंसावादी, ज्येष्ठ, समाजकारण करणार्‍या वयोवृद्धावर बिर्ला मंदिराबाहेर प्रार्थना करण्यासाठी जाताना असा प्राणघातक हल्ला करणार्‍या नथुराम गोडशाचे गुणगाण करणारे मेसेजेस आज वॉट्सप वर येत आहेत. ते वाचुन फॉर्वर्ड करणार्‍यांवर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. हे कमी की काय म्हणुन एका संघटनेच्या अनुयायांनी म. गांधी यांची पुण्यतिथी 'गोडशे श्टाईल' करण्याचे योजले ते पाहुन कोणाही भारतीयाच्या मनात "हे राम..!" आल्या शिवाय रहाणार नाही.

https://www.timesnownews.com/india/article/mahatma-gandhi-martys-day-mah...

आज 'काही' लोकांकडुन हेतुपुरस्सर फॉर्वर्ड झालेले मेसेज असोत कि वरील लिंक मधे म. गांधींच्या पुतळ्यावर झाडल्या गेलेल्या गोळ्या असोत, हे पाहुन मनात आले एका माणसाची हत्या करणार्‍या खुन्याची भलामण करताना जनाची नाही निदान मनाची तरी टिंब टिंब वाटु नये का? की एका खुन्याची बाजु घेणे हेच यांचे संस्कार आणि संस्कृती? आपण नक्की काय करतोय हे तरी त्या लोकांना समजते का..??

G.jpgहे राम...!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वरील बातमीत घडलेली घटना हि अतिशय घृणास्पद आहे. या असल्या "वाचाळवीरांना" पायबंद घालण्याची वेळ आलेली आहे...

हे करण्याची खरंच गरज नाहीये ... मूर्खपणा आहे सगळं.
DJ - कृपया सागरा अगस्थी आला हे पुस्तक वाचा आणि मला आपले मत सांगा

घटना नि:संशय लाजिरवाणी आहे पण त्यापाठीमागे असणार्‍या मानसिकतेचं काय..? हीच सडकी मनसीक वृत्ती जोपासण्याचे बाळकडु मिळालेल्या लोकांकडुन 'नथुराम गोडसे अमर रहे' च्या घोषणा दिल्या गेल्या. अशा संस्कारात वाढलेल्या आणि हीच हीन संस्कृती जपणार्‍या नेभळटांकडुन नेमका कसला भारत घडविण्याचे काम होणार..??

गांधीजीना अभिवादन !
--
हे पाहुन मनात आले एका माणसाची हत्या करणार्‍या खुन्याची भलामण करताना जनाची नाही निदान मनाची तरी टिंब टिंब वाटु नये का? की एका खुन्याची बाजु घेणे हेच यांचे संस्कार आणि संस्कृती? आपण नक्की काय करतोय हे तरी त्या लोकांना समजते का..??
<<

१९८४ मध्ये इंदीरा गांधी यांच्या हत्येनंतर स्वत:ला महात्मा गांधी यांचे अनुयायी म्हणवून घेणार्‍या अहिस्ंक कॉंग्रेसी नेते/समर्थकांनी लाखो निरपराध शिखांचे जे हत्याकांड केले होते व त्या हत्याकांडाचे समर्थन स्वर्गीय राजीव गांधी यांनी "एक बडा पेड गिरता है, तो धरती थोडी हिलती है" असे केले होते त्यावेळी वरिल प्रवचन राजीव गांधींना कुणी दिल्याचे मी तरी आजवर ऐकले नाही.

घृणास्पद कृत्य आहे. अर्थात विनाशकाले विपरीत बुद्धी.

नथुराम गोडसे यांचा खांदा वापरला गेला होता.... आपण नथुराम गोडसे यांना दोष देणार, त्यांचा निषेध करणार पण हत्येमागचा ब्रेन ? मला नथुराम यांची किव येते... बळीचा बकरा बनला बिचारा...

मुंबईवर हल्ला करणार्‍यात कसाब होता.... त्याला खुप झोडपले... पण मागचा ब्रेन आजही मोकळेपणाने वावरत असतो.

>>हे पाहुन मनात आले एका माणसाची हत्या करणार्‍या खुन्याची भलामण करताना जनाची नाही निदान मनाची तरी टिंब टिंब वाटु नये का? की एका खुन्याची बाजु घेणे हेच यांचे संस्कार आणि संस्कृती? आपण नक्की काय करतोय हे तरी त्या लोकांना समजते का..??
<<

१९८४ मध्ये इंदीरा गांधी यांच्या हत्येनंतर स्वत:ला महात्मा गांधी यांचे अनुयायी म्हणवून घेणार्‍या अहिस्ंक कॉंग्रेसी नेते/समर्थकांनी लाखो निरपराध शिखांचे जे हत्याकांड केले होते व त्या हत्याकांडाचे समर्थन स्वर्गीय राजीव गांधी यांनी "एक बडा पेड गिरता है, तो धरती थोडी हिलती है" असे केले होते त्यावेळी वरिल प्रवचन राजीव गांधींना कुणी दिल्याचे मी तरी आजवर ऐकले नाही.
Submitted by अनिरुध्द.. on 30 January, 2019 - 09:57 <<

इथेही तुम्ही इंदिरा गांधींच्या खुन्याची बाजु घेऊन झालेल्या दंगलीबद्दल राजीव गांधींना दोष देताय.. असाच दोष गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलीबद्दल नथुराम गोडशाला आणि त्याच्या पितृसंस्थेलाही उदारपणे द्या..!!

मायबोलीवरच्या एक सदस्याने गांधी जयंतीच्या दिवशी पिस्तूलाचा फोटो टाकून "ठो sss धुडुम" अशी पोस्ट केली होती.
त्याची आठवण झाली.

आजही आपल्यात नथुराम गोडसे आहेत. त्यांनी त्यांचा खांदा वापरण्याची परवानगी दिली. आजचे छोटे नथुराम धर्म कार्य म्हणुन WA, facebook मार्गाने आलेला e-कचरा कुठलिही खर्‍या खोट्याची शहानिशा न करता पुढे फॉरवर्ड करतात. थोडे थांबा, विचार करा.... सत्य काय आहे याची खात्री करा.

<< राजाश्रय असल्याशिवाय एवढ्या उघडपणे असं कृत्य करणे थोडं अवघड आहे. >>
----- लोकांच्या अज्ञानाचा वापर होतो आहे.... पुढेमागे फायद्यासाठी या 'भोळ्या भाबड्या" जनतेपैकीच कुणाचा बळी द्यावा लागला तरी हे स्वार्थी लोक कचरणार नाहीत. कधी कंडिशनींगचे प्रमाण एव्हढे झालेले असते... बळी गेलेल्या व्यक्तीला पण तो सर्वोच्च समर्पण आणि धार्मिक कार्य करत आहे असे वाटायला लागते...

वरील बातमीतील घटना नि:संशय लाजिरवाणी आहे. >.> +1
Heen pravrutti.
Please note - Not commenting on what Nathuram did. Its a matter of different discussion.

Pan ase ka karavese vatave! Atishay vaait prakar!

<< Please note - Not commenting on what Nathuram did. Its a matter of different discussion.>>
------- आपले वाचायला विचार वाचायला आवडतील. different discussion किंवा इथेच लिहा.

<< Pan ase ka karavese vatave! Atishay vaait prakar! >>
------- असे म्हणजे नक्की काय?

फिर भी देखो, गांधी मुस्कूरा रहा है....

गोली चलानेवाले कल भी रोये थे, आज भी रो रहे है, कल भी रोते रहेंगे.
गांधी हंसता रहेगा, हमेशा हमेशा!

हलकटपणाची कमाल आहे!!! निषेध!
>>Please note - Not commenting on what Nathuram did. Its a matter of different discussion. >> देअर आर फाईन पीपल ऑन बोथ साईड्स. हो ना?

असे म्हणजे नक्की काय? >>
Whatever people did on Gandhi's punyatithee.
Baba amate says in one of his poems that people will find it hard to believe that this person "happened" (he was that great).
I was not willing to write here since i have read how people fight like cats and dogs on this topic, on any political topic. I cant do it. I shouldn't do it since i have better things in my life.
I m a person who believe in seeing what is good and bad on each side (of course based on my capacity to understand). But that is not acceptable anymore.

U either have to be modi hater or modi lover.
You either have to be bjp or congress.
You have to hate Gandhi or hate nathuram.
You can say they both did what they did because they believed in certain principal,whether those principals had merit or not - needs to be evaluated. But intentions wise it was principal. no, i cant say this. Because If i say that - People will jump so badly on me. I dont think i deserve it for trying to think what i feel is balanced. (whats my capacity etc is a different question)
I cant have a "campu" to protect me from trolling (like they do for each other) because i would say "i dont like modi governments apathy and disregard for environment and hence i wont vote for him". Modi haters on this portal are also god haters incidently so they wont support me since i do believe in god.
we celebrate chrismas since my childhood, my dad has been helping poor, bringing joy to kids by being santa since last 3 decades when christmas was not " in" thing. My uncle fasts on ramadan. I am fascinated with budha. My mavashi loves and is inspired by Ambedkar's thoughts and we all believe he was a great soul to change such a dire situation in india. That doesn't stop any of us from loving our own religion and God. I dont like radical institutes from any religion, including Hindu radicals. but here are people who would tag me along with them because i am strong believer in God.
so far i could only associate myself with only one group - environmentalist, people who believe in protection of mother earth. But are never a popular group (i dont care whether popular or not in this aspect)
My grandpa who is greatest influence on me was a "kattar" congress leader pre and post independence. But taught us our difference of opinion should not be a cause of hatred. Only character of a person can determine if u want to associate urself with that person in some way or not. No one in my family is associated with RSS in any way. (Ones i can associate my thought process with).so i know i m not going to be popular with that group as well.

I know it would be impossible for some to understand i respect both Gandhi and Savarkar for their strength of character, Strong will and love for country.
I also believe that killing a person for his thought s s NOT a right thing. If u feel their thoughts dont have merits u can argue, but killing is not the right way. (Trolling,using entire group to write hate posts for a person and making that person feel pathetic is e-killing. People who feel its fun and its justified should think if they are any different than killers of people like dabholkar)
Agree to disagree in no more on cards, religious/political tolerance seems impossible.
Apart from that people here have problem with my english.i wrote all this because someone asked.
People who have problem with english should definitely ignore because they wont think/empathize that there might be some technical issues this person has - who was writing well in marathi earlier. Happy

किती मारले तरी गांधी मरतच नाही. म्हणून सत्तर वर्षानीही त्याला गोळी घालून मारण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरुच आहेत. राक्षस वगैरे संबोधून, गांधीवध म्हणून त्याची प्रतिमा मलीन करण्याचे सुरुच आहे. पण तो कसला बधतोय. त्याला गोळ्या मारणारे कित्येक षंढ आले नी गेले. कालच्या प्रकाराने तर या षंढ वृत्तीचे आणि त्यांच्या अनुयायांचे ओंगळवाणे दर्शन घडवले. राक्षस कोण आहेत ते उघड झाले.

हे सगळे प्रकार पाहता पुराणात ज्यांना राक्षस, आसूर, नरकासुर, डिमकासूर, फलानासूर वगैरे वगैरे नावे देऊन हजारो वर्षे बदनाम केले आणि त्यांना मारल्याचा वध केल्याचा आनंद म्हणून अजूनही सण साजरे केले जातात ते "राक्षस" म्हणजे नक्कीच त्याकाळचे चांगले लोक असावेत असे आताशा वाटू लागले आहे. वुई नीड टू रिव्हिजीट देम.

असो. तो वेगळा विषय. पण गांधी मात्र मात्र दिवसेंदिवस उभारीच घेत आहे. या पार्श्वभूमीवर हि पोस्ट खूपच बोलकी आहे. तिचा मूळ लेखक मी नाही. कोण आहे माहित नाही. पण क्रेडीट त्यांनाच. मी फक्त कोपी पेस्ट केले आहे...
.
.
.
गांधी हा प्राणीच डेन्जर होता. त्याला वगळून कुणी पुढे जाणारच नाही. गांधी मेला नाही, मरणारही नाही. मुळात गांधी मरतच नाही.
भाजपला मतांसाठी गांधी हवा, तर कुणाला ब्रँड म्हणून गांधी हवा. कुणाला गांधीचे विचार हवेत, तर कुणाला टीका करण्यासाठी गांधी हवा. तर त्या शरद पोंक्षेंना पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी. कारण काहीही असो, गांधी लागतोच.

किती आले किती गेले. काहींनी जमेल तितकी जमेल तशी बदनामी केली तर काहींनी हव्या तेवढ्या हव्या तशा शिव्या दिल्या. अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या जगविख्यात शास्त्रज्ञाने गांधीचं तोंडभरुन कौतुक केलं, तर इकडे त्याच गांधीच्या त्याच्याच देशातला पोंक्षे नावाचा जगप्रसिद्ध झी मराठी पुरस्कार विजेता अभिनेता कथित चुका सांगत नाटकातून पैसे कमवतोय. ज्या संघाची कायम विरोधी भूमिका राहिली, त्या संघाची राजकीय संघटना असलेल्या भाजपमधील नेत्यांनाही अगदी मोदिसकट गांधीजींना राजघाटावर जाऊन नमन करावं लागतं. म्हणजे काय, तर गांधी मरत नाही.

भाजपच्या पोस्टरवर गांधी
मुदीशेठच्या भाषणात गांधी
केजरीवालच्या टोपीवर गांधी
अण्णा हजारेंच्या उपोषणात गांधी
हाॅलिवूड पिक्चरात गांधी
पोंक्षेच्या नाटकात गांधी
वर्ध्याच्या आश्रमात गांधी
आश्रमातल्या विश्रामात गांधी
ओबामाच्या तोंडी गांधी
मंडेलाचं आयुष्य गांधी
इकडे गांधी तिकडे गांधी
जिकडे तिकडे गांधीच गांधी.

म.गांधीना विनम्र अभिवादन!

बाबा आमटे की आइन्स्टाइन?
इथे आणि एकंदरीत सोशल साइट्सवर लिहिणार्‍यांबद्दल नानबांनी अनेकदा तुच्छतापूर्ण शब्द वापरलेत. "लोकांना इथे लिहायला वेळ कसा मिळतो?" आताही I have better things in my life. असा बाण मारलाच आहे.
मागे त्यांचा एक आक्षेप होता, की तुम्ही ज्याबद्दल लिहिताय त्याचा तुम्हांला प्रत्यक्ष अनुभव्/त्रास काय? म्हणजे मी फक्त माझ्याच वर्तुळात घडणार्‍या घटनांबद्दल सजग असू नये. व्यक्त होऊ नये. त्या स्वतः फक्त त्यांच्याशी संबंधित काही असलं तरच रिअ‍ॅक्ट होतात. (स्पष्टच लिहायचं तर कुठे ब्राह्मण बॅशिंग दिसलं की). त्यांनी प्रत्येक बाबतीत व्यक्त व्हावं असं मी म्हणत नाही. पण जे असं करतात, त्यांना रिकामटेकडे, मॉब लिंचर्स इ.इ. लेबलं लावणं समजुतदारपणाचं लक्षण नक्कीच नाही.

बाकीचे सगळे टोळी करून राहतात आणि आपण तेवढे त्यातले नाही, हा अहंभावही फुकाचा आहे. त्यांच्या प्रतिसादांचा पॅटर्न पाहिला की त्यांचीही टोळी दिसतेच.

आता वर लिहिलंय त्यात नवं काहीच नाहीए. खरंतर काहीच नाहीए.

>>>You can say they both did what they did because they believed in certain principal,whether those principals had merit or not - needs to be evaluated.
>> बीजेपी, कॉग्रेस, संघी, मोदी, राहुल कोणालाही प्रेम करा किंवा द्वेष करा माझं काहीही म्हणणं नाही.
पण नथुराम बद्दल दोघांना त्यांच्या त्यांच्या बाजू होत्या, दोघांचे काही विचार होते, मतं होती वेगळी असतील पण ती एक विचारधारा होती असलं तर्कट जे लोक मांडतात त्यांना कदापि माफी नाही.
व्हाईट सुप्रिमसिस्ट लोकांनी गोंधळ केल्यावर त्यांची स्वच्छ शब्दांत निर्भत्सना करण्याशिवाय ट्रंप दोन्ही साईडला काही फाईन पीपल आहेत असं म्हणालेला त्या म्हणण्यात आणि खुन्याची मानसिकता जाणून त्याला बेनिफिट देण्यात काडीचाही फरक नाही.
पूर्णविराम.

हे सगळे प्रकार पाहता पुराणात ज्यांना राक्षस, आसूर, नरकासुर, डिमकासूर, फलानासूर वगैरे वगैरे नावे देऊन हजारो वर्षे बदनाम केले आणि त्यांना मारल्याचा वध केल्याचा आनंद म्हणून अजूनही सण साजरे केले जातात ते "राक्षस" म्हणजे नक्कीच त्याकाळचे चांगले लोक असावेत असे आताशा वाटू लागले आहे. वुई नीड टू रिव्हिजीट देम.

सहमत

नथुराम बद्दल दोघांना त्यांच्या त्यांच्या बाजू होत्या, दोघांचे काही विचार होते, मतं होती वेगळी असतील पण ती एक विचारधारा होती असलं तर्कट जे लोक मांडतात त्यांना कदापि माफी नाही.
>> u ignored if that process had d merit part. Happy
Also ignored the part where i said killing is not the right way.

Uday, thank for reading and understanding.
Others would read what they want to read based on their convenience , their perception.
Bharat brought brahmin part. Was it related? Did it matter here? What was my stance on that lady from weather department?
And yes i do have better things to fight for than things that are not so important to me like politics. Esp. With people who are interested in polarization.

I have said what i wanted to say.

राजाश्रय असल्याशिवाय एवढ्या उघडपणे असं कृत्य करणे थोडं अवघड आहे.>>>>>

हो न, राजाश्रय हवाच...1947 पासून मिळतोय. वर उल्लेखलेल्या सर्व गुन्ह्यांच्या घटनांमागे भक्कम राजाश्रय असल्याशिवाय कुणीही हिम्मत करणार नाही असे गुन्हे करायची.

Pages