स्वतःस मी

Submitted by देवेंद्र on 29 January, 2019 - 11:15

हताश मी , निराश मी
सांभाळ तू, स्वतःस मी

विचार तू, अविचार नको
सांभाळ तू, स्वतःस मी

विश्वास तू, अविश्वास नको
सांभाळ तू, स्वतःस मी

प्रश्न माझे, तो आहे, उत्तर त्याचे
सांभाळ तू, स्वतःस मी

जिद्द तू, खचने नाही
सांभाळ तू, स्वतःस मी

दुःख नव्हे सर्वदा, सुख येई उत्तरा
सांभाळ तू, स्वतःस मी

प्रयत्न कर, लढ तू , जिंकशील तू
सांभाळ तू, स्वतःस मी

--देवेंद्र पवार

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults