--आभास--

Submitted by Nilesh Patil on 27 January, 2019 - 01:21

--मुक्त हो रे मनपाखरा--

--आभास--

थोडासा का असेना त्रास कमी होत आहे,
सावकाश तुझा आभास कमी होत आहे..।

मोडूनी तुझे भावनारे सारे स्वप्नरंजन घरटे,
मनी बोचणारा हा श्वास कमी होत आहे..।

सारखा समोर येणारा चेहरा आता विसरूनी
तुझा मनी असणारा वास कमी होत आहे..।

होतोय डोक्यास उगा भार हा आठवणींचा
गळ्यात अडकणारा फास कमी होत आहे..।

तुझ्या दूर जाण्यानं वेदनांत फार विव्हळतांना,
या उदरामध्ये जाणारा घास कमी होत आहे..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३/९८३४४२९५२०--

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults