ग्रेस

Submitted by अनन्त्_यात्री on 24 January, 2019 - 04:12

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
जिंदगीच्या निवडुंगा
इवलेसे फूल येते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
निळ्या पाखरओझ्याने
हिर्वी वेल थर्थरते

ओळ तुझ्या कवितेची
ओठी पुन्हा पुन्हा येते
खोलवर रुजूनिया
पुन्हा पुन्हा उगवते

Group content visibility: 
Use group defaults

वा!