प्रियांका गांधी - भारतीय राजकारणातील उगवता तारा

Submitted by DJ. on 23 January, 2019 - 06:12

आज प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्या हे वाचनात आले. गांधी-नेहरु घराण्यातील अजुन एक मेंबर राजकारणात आला हे पाहुन काँग्रेसवाल्यांना जसे हायसे वाटले असेल अगदी तसेच समस्त काँग्रेस विरोधकांच्या पोटातही कालवाकालव सुरु झाली असेल. यावरुन मतमतांतरे होऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता झडु लागतील. एक व्यक्तीमत्व म्हणुन प्रियांका गांधी कशा आहेत हे मात्र कधीच समोर आलेले नाही. प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात आल्या म्हणुन त्याचा काँग्रेसला कितपत फायदा होईल..? आणि जर कॉंग्रेसला फायदा होणार असेल अथवा नसेल तरी सत्ताधारी पक्षाने घाबरुन जाऊन अकांडतांडव करणे कितपत बरोबर आहे..?

PG.jpg

Group content visibility: 
Use group defaults

एक स्त्री- तीही articulate , smart अशी तरुण स्त्री राजकारणात येणं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. Go girl, more power to you!

अगदी ग्रामपंचायतीचीही निवडणुक न लढलेली बाई फक्त गांधी आडनावामूळे एकदम सरचिटनीसपदी विराजमान होते. काँग्रेसला शोभण्यासारखं झालं आणि लोकशाही शरमली.

<< अगदी ग्रामपंचायतीचीही निवडणुक न लढलेली बाई फक्त गांधी आडनावामूळे एकदम सरचिटनीसपदी विराजमान होते. >>
-------- केवळ गांधी आडनाव आहे म्हणुन त्या अपात्र ठरतात का ? त्यांच्यात काही चांगले नेतृत्व गुण असतील तर दिसतीलच.

<<काँग्रेसला शोभण्यासारखं झालं आणि लोकशाही शरमली. >>
--------- ज्यांना जनतेने आपले बहुमोल मत दिले, निवडून आणले ते पंतप्रधान लोकसभेत किती वेळा फिरकले, कितीवेळा चर्चेत भाग घेतला ?
लोकशाही शरमली वगैरे काही नाही.

प्रियांका गांधी यांना राजकारणात कमालीची सावधानता बाळगावी लागेल. अफवा, खोटा प्रचार, टिका... यांचा धैर्याने सामना करण्याचे बळ त्यांना मिळो. यशस्वी होण्यासाठी माझ्या लाख शुभेच्छा.

काँग्रेसची एक गोष्ट आवडली ती म्हणजे प्रियांका गांधी सारख्या मोस्ट अवेटेड पर्सनॅलिटीला लाँच करताना सुद्धा अतिशय साधेपणाने लाँच करण्यात आले. कुठलाही कार्यक्रम नाही, सभा नाही, बैठक नाही, पत्रकार परिषद सुद्धा नाही. फक्त एक प्रसिद्धिपत्रक काढले ज्यात तिसर्‍या पॅरेग्राफ मधे प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नेमणुक झाल्याची एका वाक्यात माहिती दिली होती. किती हा साधेपणा..!

हेच जर सत्ताधारी पक्षामधे घडले असते तर किती करोडचा चुराडा करुन इव्हेंट साजरा झाला असता कोण जाणे. Uhoh

लोकसभा निवसणुकीआधी चांगलं मूव्ह!
पण मला आतातरी कुणीही गांधी घराण्यातील माणूस पंतप्रधान पदासाठी पुढे नकोय. काँग्रेसमध्ये अजून खूप चांगली नावे आहेत, ती यायला हवीत!

गांधी घराण्यातील माणूस पंतप्रधान पदासाठी पुढे नकोय >> अहो हे भाजप्यांना सांगा, तेच पप्रपोगंडा करत आहेत

दिसायला छान आहे. पण बाकी नन्तरच कळेल. (अवांतर : राहुल गांधींबद्दल माझं मत आधी फार वेग्ळं होतं. इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर राजीव गांधींना बिलगून रडतानाचा व्हिडिओ पाहून आजीची हत्या झाल्याचे दु:ख झालेला हळवा नातू , राजीव गांधींच्या हत्येनंतर आईची काळजी वाटणारा मुलगा. पण नंतर मात्र घोर निराशा Sad )

... पण नंतर मात्र घोर निराशा>> गुजरात-पंजाब-कर्नाटक-छत्तिसगढ-म.प्र.-राजस्थान येथील विधानसभा निवडनुकीनंतर सुद्धा निराशा टिकुन आहे का..? Wink Wink Wink

पण नंतर मात्र घोर निराशा>> गुजरात-पंजाब-कर्नाटक-छत्तिसगढ-म.प्र.-राजस्थान येथील विधानसभा निवडनुकीनंतर सुद्धा निराशा टिकुन आहे का..? Wink Wink Wink > निराशा माणूस म्हणून . त्याचा पक्ष आणि ईलेक्शन शी काही संबंध नाही. :). नरेंद्र मोदी, केजरीवाल, काही हिंदुत्ववादी
लोकं , काही समाजवादी (या दोन्हींकडे अतिशय कर्मयोगी आणि नितीमान माणसं आहेत असं मला वाटतं) , जयराम रमेश इ. विविध माणस एकाच वेळी आवडत असल्याने इलेक्शन आणि त्यावरच्या गोष्टींमधे मला रसच वाटत नाही. Happy

राम जेठमलानी आणि अरूण शौरी यांनी ग्रामपंचायतीपासून आपल्या करीयरची सुरूवात केली. पक्षकार्य करता करता आपापले व्यवसाय सांभाळत त्यांनी राजकारणाचा गाढा अनुभव मिळवला. नंतर मग व्यवस्थित चढत्या क्रमाने निवडणुका जिंकत मग शेवटी लोकसभेची निवडणूक जिंकून मगच भारतीय जनता पक्षाच्या धोरणानुसार ते मंत्री झाले.

यातले एक बोफोर्स प्रकरणात ग्रापं अनुभव मिळवून होते तर दुसरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे एक पुस्तक लिहून प्राथमिक सदस्यापासूनचा अनुभव राखून होते.

लोकशाही अशी चिखलातून फुलते.

<< केवळ गांधी आडनाव आहे म्हणुन त्या अपात्र ठरतात का ? त्यांच्यात काही चांगले नेतृत्व गुण असतील तर दिसतीलच.

हेच तर. म्हणजे समाजकार्य, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, वक्तेपण कशाशी काहिही संबध नाही. फक्त गांधीनावामूळं संधी मिळाली आणि 'काही चांगले नेतृत्व गुण असतील तर दिसतीलच'!

<< ज्यांना जनतेने आपले बहुमोल मत दिले, निवडून आणले ते पंतप्रधान लोकसभेत किती वेळा फिरकले, कितीवेळा चर्चेत भाग घेतला ?
लोकशाही शरमली वगैरे काही नाही.

पंतप्रधान नाही म्हणून चर्चा थांबल्या का? विरोधी पक्षाला उत्तरात रस नव्हता. पप्पूने तर राफेलवरून हाईट केली. खूद्द सरक्षणमंत्रानीही माहिती समजाउन सांगितली तरी बाहेर येउन म्हणे की पंतप्रधानांनी पळ काढला.

बाकी मोदी प्रचंड अहंकारी आहेत. 'सगळ्यातलं सगळं मलाच जास्त कळतं','सगळे निर्णय मी घेणार' असल्या अ‍ॅटिट्युडमूळे बर्‍याचदा नूकसान झालयं. भाजपासारख्या पक्षाला पर्याय नसावा हे प्रचंड लाजिरवाणं आहे.

हेच तर. म्हणजे समाजकार्य, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, वक्तेपण कशाशी काहिही संबध नाही. फक्त गांधीनावामूळं संधी मिळाली आणि 'काही चांगले नेतृत्व गुण असतील तर दिसतीलच'!
<<
अय्यय्यो!

म्हणजे जंगलात राहणे.
शिक्षण काय घेतले ते गुलदस्त्यात ठेवणे.
रेल्वेत चहा विकला असे ठोकून देणे.
आत्ताच नव्याने पुडी सोडलीय. हिमालयात गेले होते म्हणे. पुराव्या दाखल चांगले इस्टमन्कलर फोटू टाकलेत हिमालयात थंड पाण्याने आंघोळ करतानाचे! १९६७, वय वर्षे १७!! असली ५६ इन्ची दाढी!! अन कलर फोटॉ!! वाह!

सुप्रीम लीडर जो आहे, तो संपूर्ण प्रोपोगंडा आहे. नो सब्स्टन्स अ‍ॅट ऑल.

रच्याकने, खुद्द संरक्षणमंत्री खोटं बोलले म्हणजे झालं का?

सुधरा हो. उघडा डोळे, बघा नीट.

<< लोकसभा निवसणुकीआधी चांगलं मूव्ह!
पण मला आतातरी कुणीही गांधी घराण्यातील माणूस पंतप्रधान पदासाठी पुढे नकोय. काँग्रेसमध्ये अजून खूप चांगली नावे आहेत, ती यायला हवीत! >>
--------- २०१४ पर्यंत माझेही असेच मत होते. तेव्हा मोदी आलेत, खुप आनंद झाला होता, आता काही बदल घडवतील. पण नाही.

जुमलेबाजी#१ करत सत्तेवर आलेत. जनतेच्या अपेक्षा होत्या लाख कोटी काळा पैसा बाहेर आणतील. मोठे आकड्यांचे गैर व्यावहार करणर्‍यांना खडी फोडायला तुरुंगात पाठवतील. देशाबाहेर गेलेला पै पै देशात परत आणतील. सर्वत्र सुजलाम सुफलाम.... असे राम-राज्य आणतील. मल्या पळाला, निरव मोदी, चोक्सी देशाबाहेर पळाले. आता ते देशातच नाही तर त्यांना शिक्षा होण्याची शक्यता शुन्य आहे.
यांना पळवण्यात मदत केली, अथवा नाही या बाबत सरकारची भुमिका संशयास्पद आहे. नरेन्द्र मोदी यांच्या नाकावर टिच्चुन हे लोक पळाले कसे ?
ना खाऊंगा... ना खाने दूंगा... असे म्हणत सत्तेवर आले पण गरिब जनतेचे कल्याण करण्यापेक्षा अंबानी - आडाणी यांचे हित जपण्यातच यांनी धन्यता मानली.

बिफ बॅन, बिफ बाळगल्याच्या निव्वळ 'संशयावरुन' हत्या, पोलिस ठाण्यावर जमावाने हल्ले केले, अत्यंत निर्घुणपणे पोलिस अधिकार्‍याची हत्या केली... धडकी भरावी पण गैर-कृत्य करणार्‍यांना... पण आज पोलिस अधिकारी/ साक्षिदार आणि त्यांचे कुटुंबिय यांनाच दहशत वाटावी असा यांचा प्रचंड दब-दबा... एक खोटे (मानवी हत्या) लपवण्यासाठी कितीवेळा खोटे (अजुन मानवी हत्या करणार) बोलणार?

कुठलाही विचार न करता नोटबंदी. काल जेव्हढा पैसा चलनात होता तेव्हढा सर्व परत आला... डिजिटल अर्थव्यवस्था, डिजिटल अर्थव्यवस्था .. अरे पण हार्ड करन्सीचा वापर ३० + % वाढला आहे असे RBI चा रिपोर्ट सांगतो... तुमच्या मनमानी पणाची जनतेला एव्हढी मोठी जबर शिक्षा का?

ज्यांच्या शैक्ष्णिक डिग्र्याच खोट्या आहेत, सहा दिवसाच्या कुठल्याशा येल कोर्सला डिग्री समजणारे देशातल्या जनतेला खरा रिपोर्ट कार्ड सादर करतील अशी अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे. रिपोर्ट कार्ड मधला प्रत्येक डेटा तपासावा एव्हढा मोठा अविश्वास आज यांनी मिळवला आहे.

लोकांना सकारात्मक विचार हवे आहेत. ७० वर्षात हे केले नाही, ते केले नाही हे रडगाणे एकवण्यासाठी तुम्हाला नेमले नाही आहे. प्रत्येक मिळालेल्या संधीचे सोने करा.... संधीचे सोने केले, १३५ कोटी जनतेचे हित जपले तर लोक स्वत: तुम्हाला डोक्यावर घेतिल... प्रियांका आली काय, नाही आली काय याने धडकी भरायचे कारणच नाही.

अन्यथा जुमलेबाजी भाग दोन सादर करावा लागेल... अर्थात जुमलेबाजी#२ ला मतदार राजा भुलतो का हे लवकरच दिसेल.

मला १३५ कोटी जनतेसाठी प्रामाणिक तळमळ असणारा नेता/ पक्ष पुढे आलेले बघायला आवडेल.

भारत हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी प्रियंका जी काय करतात त्या वर त्या उगवता तारा आहेत की नाही ते ठरेल. तोपर्यंत वेट अँड वॉच!!!

<< पंतप्रधान नाही म्हणून चर्चा थांबल्या का? विरोधी पक्षाला उत्तरात रस नव्हता. पप्पूने तर राफेलवरून हाईट केली. खूद्द सरक्षणमंत्रानीही माहिती समजाउन सांगितली तरी बाहेर येउन म्हणे की पंतप्रधानांनी पळ काढला. >>
-------- तुर्रमखान तुम्ही पप्पू म्हटले आहे, बरेच तासांनी हा शब्द वाचायला मिळाला. अर्थात मी फेकू, जुमलेबाज हे शब्द वापरणार नाही. शब्दसाठ्यात माझ्या मोठ्या मर्यादा आहेत. विरोधी नेता/ विचार असेल तरी त्यांना आदराने संबोधल्यास कमी पणा नाही. त्याने तुमचाच गौरव होतो. राहुल गांधी यांच्य मर्यादा सर्वांना माहित आहेत.

पंतप्रधान यांनी त्यांच्या वर्तणुकीमधुन एक चांगले उदाहराण घालवुन द्यायचे. लोकशाही मधे राजसभा/ लोकसभा मधे चर्चेला महत्व आहे. प्रधान व्यक्ती चर्चे भाग घेत नसतील, चर्चेला पाठ फिरवत असतील, चर्चे मधे गंभिरता नसेल तर जनतेला कुठला संदेश मिळतो? जनता म्हणजे देशाची १३५ कोटी संख्या (भारतीय जनता थोडा गैरसमज होतो म्हणुन टाळतो).

जनतेला कुठला संदेश मिळतो?
<<
बेसिक संदेश "तुम्ही मूर्ख अज्ञ जन आहात. गुरुमाऊली सांगेल तसे वागा. तुमचा अधिकार नाही. तुमची पात्रता नाही. जन्मास येणे हाच तुमचा गुन्हा. यातून मुक्ती हवी तर फक्त आज्ञा पाळा. झापडे बांधा अन गुरूमाऊलीचे भजन करा." हा आहे.

अर्थात, हुकुमशाहीला मान तुकवा.

भाजपेयी बडवे लोकांना हीच येडी घालत आहेत. अन अनेक सूज्ञ स्वतःस येडी घालून घेत आहेत.

कारण नैका, मोदी नसेल तर फक्त केऑस! (याला मराठी किंवा हिंदी शब्द नैय्ये बर्का. हीम्दी हिमदू हिंम्दूस्तानच्या नानाची टांग. इथे आम्ही केयोसच म्हण्णार.)

Why the HECK do they forget that people know, that the whole universe was born out of chaos?

Pages