जुने कपडे कुणाला हवे आहेत का?

Submitted by Mi Patil aahe. on 22 January, 2019 - 09:37

जुने ,फारसे न वापरलेले बय्राच प्रकारचे कपडे कुणाला हवे आहेत का? म्हणजे तसा कोणी गरजवंत आपणास ठाऊक आहे का? एखादे आश्रम,संस्था जे लोकांची 'अशाप्रकारची'मदत आनंदाने स्विकारते-- तरी कृपया त्यांचा पत्ता आपण येथे देऊन मला'कपडे(वस्त्र) दान' करण्याच्या कार्यात मदत करून आपणही "मदतदान" /"माहितीदान" करुन पुण्यप्राप्ती करून घेवू शकाल.
पर्यायाने घरातला पसारा कमी; वर पुण्याची प्राप्ती जास्त!!!!!
तसे मला गुप्तदान करायचे आहे; पण, योग्य व गरजू व्यक्ती तरी, आधी मिळायला हवी ना!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नाक्यावरच्या एखाद्या मोकळ्या भिंतीवर खिळे ठोका त्यावर कपडे लटकवा. सोबत फळा लिहा. जे गरजू असतील त्यांनी गरजेनुसार कपडे न्यावेत. आणि ज्यांच्याकडे कपडे आहेत त्यांनी ईथे लटकवावेत. एक देवाणघेवाण सुरू होईल ...

मी पण एकदा बायकोचे जुने कपडे घेऊन एका संस्थेत गेलो होतो, तर तिथली बाई म्हणाली की बोहारणीला द्या.
मी म्हटले, अहो, जगात इतके गरीब, उपाशीपोटी लोक आहेत त्यांना द्या जरा. तर ती बाई मला म्हणे या आकाराचे कपडे कुणाला होत असतील तर ती व्यक्ती नक्कीच उपाशीपोटी नसणार. मग मी तो नाद सोडला.

आमच्याकडे कामाला ताई येतात, त्यांना देतो आम्ही. त्या गावी घेऊन जातात, तिथे अनेक गरीब कुटुंब आहेत आणि ते त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांनी आम्हाला सांगून ठेवलंय आधीच, कपडे भांडी काही असतील तर मला देत जा. त्यामुळे हा प्रश्न येत नाही कधी. सोसायटीतले काहीजण सफाई कामगार येतात त्यांना देतात.

तुम्ही अशा कोणाला हवे असल्यास विचारुन देऊ शकता, तुमच्या आसपास.

एक दोन संस्था माहीत आहेत. पण अशी कुणाची माहिती उघड केली तर इथे चमत्कारीक अनुभव येतात. वैयक्तिक माहिती दिलेली नसतानाही लोक कांगावा करतात तर फोन नंबर देणे चुकीचेच वाटते. भले उद्देश चांगला असेल. तुम्ही स्वतःहून नंबर देऊ शकलात तर त्या संस्थेला थेट पाठवीन. म्हणजे तुम्ही काय ते आपसात बघून घेऊ शकाल.

उपाशी बोका,
तुम्ही उपहासाने लिहले आहे का माहीत नाही; पण हे खरंच खरं आहे. फक्त कपडे जमा करणारी संस्था नको तर ती गरजुना त्यांच्या आकारानुसार कपडे अल्टर करून देणारी संस्था हवी आहे.
बादवे बोहरणी काय करतात त्या कपड्यांचे?

विकतात.

ह्या कपड्यांची खूप मोठी बाजारपेठ आहे