पुन्हा

Submitted by रुपेंद्र कदम 'रुपक' on 22 January, 2019 - 00:38

पुन्हा काळजावर जखम होत आहे
पुन्हा वेदना ही मलम होत आहे

पुन्हा वाट अडवी तुझा तोच काटा
पुन्हा टाच माझी नरम होत आहे

पुन्हा न्याय माझा सजा भोगतो अन
पुन्हा मान माझी कलम होत आहे

पुन्हा थंड वारा लपेटून जाता
पुन्हा एक काया गरम होत आहे

पुन्हा राहिला हात त्याचा रिकामा
पुन्हा भूक त्याची खतम होत आहे

पुन्हा एक साधू पुन्हा एक संधी
पुन्हा एक भक्ती परम होत आहे

पुन्हा तोच पडदा सरत बंद झाला
पुन्हा नाटकाचा जलम होत आहे

© रुपेंद्र कदम 'रूपक'
✍ पुणे, 29 ऑक्टोबर 2018

Group content visibility: 
Use group defaults