"स्त्री-पुरुष मैत्री"=एक शोध अन् बोध

Submitted by Mi Patil aahe. on 20 January, 2019 - 01:41

स्त्री-पुरुष समानता
स्त्री-पुरुष मानसिकता
स्त्री-पुरुष दृष्टीकोन
स्त्री-पुरुष विभाग
स्त्री-पुरुष विषमता
स्त्री-पुरुष संबंध
स्त्री-पुरुष विचार व आचार
स्त्री-पुरुष भेद
स्त्री-पुरुष भावना
स्त्री-पुरुष विज्ञान
स्त्री-पुरुष सर्जरी
ही अशी लांबलचक यादी आणखी लांबली जावू शकते-----
त्याच पठडितला "स्त्री-पुरुष मैत्री" हा मानला तर विचार, विषय, प्रश्र्न सारे आपल्या मानण्यावर अवलंबून आहे.
तर ही मैत्री काळाची गरज आहे? काळाची हाक आहे,की काळाची साद?????
स्त्री-पुरुष मैत्री काळाच्या पुढची धाव आहे ;की काळाच्या ओघातली ,निसरडी वाट आहे????
स्त्री-पुरुष मैत्री ही वयपरत्वे बदलणारी असते; की काळानुरूप घट्ट होणारी असते??????
स्त्री-पुरुष मैत्री हे निखळ निर्व्याज प्रेम असते? की निर्मळ आपुलकीची वागणूक/भावना असते?????
स्त्री-पुरुष मैत्री ही पदरात पडलेली ठिणगी, की निसर्गाने केलेली योजना आहे?
स्त्री-पुरुष मैत्री एक संधी आहे की माणूसकी चे आव्हान आहे?
स्त्री-पुरुष मैत्री नव्या नात्याची सुरुवात आहे की जुन्या नात्याला लागलेली कीड आहे?
स्त्री-पुरुष मैत्री ही काळजातली ओल आहे की काळजाला पडलेली दरी आहे?
स्त्री-पुरुष मैत्री जंगलात पेटलेला वणवा की घरातला गारवा आहे?
स्त्री-पुरुष मैत्री सैराटची आर्ची-परश्याची लवस्टोरी की मायबोलीवरची बंधू भगिनी ची जोडी आहे?
स्त्री-पुरुष मैत्री कपातला गरम चहा की ताटात वाढलेलं गरमगरम जेवण आहे?
स्त्री-पुरुष मैत्री नुकतेच जन्मलेले बाळ आहे की सरणावर चढलेल प्रेत आहे?
स्त्री-पुरुष मैत्री ही आधुनिकतेचे लक्षण आहे की निव्वळ फ्याड आहे??????
स्त्री-पुरुष मैत्री नात्याला पडलेल गोड स्वप्न म्हणावे की नात्याला (पती-पत्नी) पडलेलं भगदाड?????
स्त्री-पुरुष मैत्री उज्वल भविष्याची लागलेली चाहूल की भूतकाळात दडलेली रहस्यमयी भुयारी मार्ग?????
या स्त्री-पुरुष एक मैत्री विषयावर मार्गदर्शन करणं कठीण आहे का? तेसुद्धा मायबोलीवर,मायबोलीकरांसाठी?????
असं का होतं आहे, अनुभव नसल्याने की असल्याने????????
ज्ञान, माहिती देण्यात नुकसान होते का मायबोलीवर मायबोलीकरांचे????
स्त्री-पुरुष एक मैत्री विषयावर कोणी काही शोध निबंध लिहून ठेवले आहे का? किंवा कोणी काही लिहिले वा लिहायला सुरुवात केली आहे का?
स्त्री-पुरुष एक मैत्री यावर प्रश्नाव्यतिरीक्त सध्यातरी माझ्याकडे काहीच नाही असे जाणवते आहे.याविषयावर मला लिहायला आवडेल!!!! पण काय करू, काय लिहू? का कुणास ठाऊक; काहीतरी राहून जाते आहे, असे वाटते!!!
@विशेष सूचना@
१)योग्य प्रतिसाद दिल्यास; आपला शाल,श्रीफळ,गुच्छ देऊन, सत्कार शांततेत पार पडला,असे समजून चालावे.

२)फालतू प्रतिसाद/ प्रतिक्रिया दिल्यास; आपल्याला आधिच, "निरोपाचा नारळ" घरपोच मिळाला ;असे समजून काढतां पाय घ्यावा, तोही शांतीने (अर्थात चूपचाप)!!!!

३)आपण वरील पैकी कोणतीही क्रिया केली नसेल तर आपण फक्त "बघे"आहोत याची स्वत:ला खात्री द्यावी,अगदी शांतीपूर्वक!!!

४)यात कुणाला फायदा झालाच तर त्यांनी तृप्तीची ढेकर न विसरता लागलीच द्यावी!!!!!!

५) जर तोटाच पदरी पडला; तर दु:खाच्या भरात, स्वत:च व इतरांच बरं-वाईट करण्याच्या फंदात न पडता, शांतपणे राहावे.......

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्त्री-पुरुष एक मैत्री म्हणजे "ठिणगी पेटलीच", उशिरा का होईना!!!!,
>>>>>>तर 2 -5 वर्षाने तरी ठिणगी पेटतेच>>>>>>
याचा अर्थ असा समजून चालावे का?????