वाट...

Submitted by मन्या ऽ on 16 January, 2019 - 14:07

वाट...(दिप्ती)

जुन्याच एका वाटेवर
वाट चुकले होते मी
आज पुन्हा मी
त्याच वळणावर
नवी वाट शोधत आहे मी

भांबावलेली आहे मी
गोंधळले हि आहे मी
वाट पुन्हा पुन्हा शोधून
दमले आहे मी

अशी कशी मी हि वेडी
इतकी कशी मी बावरलेली
वाट स्पष्ट समोर असुनही
वाट शोधत भटकणारी मी

वाट हरवली आहे म्हणून
जीवनात माझ्या
निराशेचा हा काळोख
देईल का मज करुन कोणी
माझ्या नव्या वाटेची ओळख

अखेरीस कुणीतरी
हाक मजला दिली
हिच आहे ती वाट तुझी
अशी खात्री मजला दिली

ती हाक ऐकून
धीर आता मजला आला
हाक देणारा आवाज
मला आता ओळखीचा वाटला

उमजले मजला नंतर
हि हाक तर आहे
माझ्याच अंर्तमनाची
त्यानेच तर शोधली आहे
वाट माझ्या नव्या प्रवासाची

पुन्हा जुन्या त्या वळणावर
मी मला नव्याने भेटले
माझी मी मलाच आता
नव्याने ओळखू लागले

एकदा वाटले माझे मलाच,
हा तर आहे परतीचा प्रवास
तेव्हा अंर्तमनाने दिला आवाज
हा तर आहे
तुझ्या आयुष्याचा
नव्याने घडणारा प्रवास!

(Dipti Bhagat)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय !
वाट..........

आहे मी तुझी साथीदार
वाटेत वाट दाखवणारी
तुझ्या सवे आनंदाने
सहगमन मी एकटीच करणारी
अशी तुझी वाट..........

यश

Chan

Chan

यतीन, तुमची चारोळी सुंदरच! आणि प्रतिसादासाठी धन्यवाद! Happy Happy

अक्की, उर्मिला, नीस्तुश प्रतिसादासाठी धन्यवाद! Happy