उशीर

Submitted by Rekhaansh on 16 January, 2019 - 05:33

उशीर

गॅलरीत बसून गार ढोण झालेला चहाचा घोट घेत असताना जांभळाचं झाड आमच्या गॅलरीमध्ये शिरकाव करण्याच्या प्रयतनात दिसत होते. येत्या आठवड्याभरात गनीम यशस्वी होईल हि, अशी चिन्ह दिसत आहे. या सर्व विचाराच्या शृंखलेत असताना चिमण्यांच्या चिचिवाटानं माझे लक्ष्य वेधले. ४ ५ चिमण्या मरणाचा कल्ला करत होत्या म्हटलं त्यांना विचारावा तरी, काय झालं ते, कदाचित एखादा साप वगैरे पहिला असेल, कारण असाच काही लहानपणी ऐकलं होतं म्हणून विचार चमकला, बाकी काही नाही. तसही आमच्या दिव्याला सापाची काही कमी नाही.
किंवा झाडाच्या वरच्या भागात एखादा चिमणा असावा आणि त्यांना बघून या चिवचिवाट करत असाव्यात कोणाला माहीत चिमण्यांच्या जगातला तो सलमानखान असावा. वाव काय हँडसम दिसतोय आणि ते बघ त्याचे ६ पॅक पंखातूनही छान दिसतायेत.

असो चिमण्या आणि त्यांचं जग या गडबडीत ऑफिसला जायला मला उशीर झाला हे कळलंच नाही आणि बॉसला
चिमण्यामुले उशीर झाला हे कारण सांगणं पण सबळ दिसणार नाही

रेखा किरण सरोदे
पुणे सणसवाडी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हॅट्स ऑफ यु ऑल एवढाच लिहिताना कंटाळा आला कसं लिहिता रे तुम्ही मानलं पाहिजे
बेफीना तर दंडावतच आहे माझा .

छान प्रयत्न !
मनातील भावना कागदावर / स्क्रीनवर व्यक्त होणे महत्वाचे आणि ते तुम्ही केले हे ही नसे थोड़के.
हळूहळू नक्कीच विस्तारतील तुमच्याही कल्पना आणि कथाही.
पुलेशु