गर्भार लेखणी

Submitted by Rekhaansh on 16 January, 2019 - 04:46

गर्भार लेखणी

बसले असता कधी अनाहूत
कविता ओठी आली ग

तेव्हा अचानक मला वाटले
गर्भार लेखणी क्षणात मोकळी झाली ग

तिला सांगायचे बरेच होते
लिहिल्या भराभर ओळी ग

तेव्हा अचानक मला वाटले
गर्भार लेखणी क्षणात मोकळी झाली ग

शब्दांचा सडा पाहोनि वाटले
लेखणीची पिलावळ शाईत नाहून गेली ग

तेव्हा अचानक मला वाटले
गर्भार लेखणी क्षणात मोकळी झाली ग

रेखा किरण सरोदे
पुणे सणसवाडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

..
ग्रुप कन्टेन्ट व्हिजिबिलिटी
मध्ये काय सिलेक्ट करायला हवं

हा ऑप्शन निवडावा
Capture07.PNG