गूढ हास्य

Submitted by Asu on 15 January, 2019 - 23:01

गूढ हास्य

आठवते कां तुला
ते चोरून पहाणे
गालाला गोड खळी पाडून
तिरक्या नजरेने तू पहायचीस
नि गुलमोहरासारखी मोहरायचीस

तुझ्या गालाच्या खळीत
माझा बळी घेऊन
लाजून गूढ हसायचीस

आजही मला ते गूढ हसणे छळते
मनात घुटमळते
मोनालिसाच्या हास्यासारखे !

मी हाक दिली असती
तर तू साद दिलीही असती
काय माहित ?

फक्त एकदाच सांगशील का ?
त्या गूढाचा अर्थ

पण आता तू थोडीच
कबलणार आहेस खरी
त्या गूढाची कबर बांधून
त्यावर फुलं वाहिलेलीच बरी

- प्रा.अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults