स्फूट - मृत्यूपत्र

Submitted by सुप्रिया जाधव. on 14 January, 2019 - 09:31

*स्फूट - मृत्यूपत्र*

प्रिय अक्षय,

तुझे बाबा ऐन उमेदीत गेले
अवघ्या बेचाळीशीतच आटोपला कारभार !

मृत्यूपत्र केले नव्हते त्यांनी
मात्र
हक्काची बायको म्हणून
आपसूकच मिळालं मला सगळं !

मी जाईन तेव्हा...
मृत्यूपत्र केले नाही तरिही
एकुलताएक वारसदार म्हणुन
तुलाच मिळणार आहे सगळं !

फक्त

डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, स्वादुपिंड आणि त्वचा सोडून...

ह्या अमूल्य संपत्तीवर
पहिला हक्क गरजवंतांचाच
नात्यांप्रमाणेच समाजाचही देणं लागतोच
की आपण !

खरतर तुझ्यासाठीच करतेय हे मृत्यूपत्र

तुझे बाबा अचानक गेले
ते कायमचेच !
मी मात्र रेगांळेन म्हणते नंतरही काहीकाळ !

निदान तुला मी नसण्याची सवय होईपर्यत !!

तुझीच आई,
सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिडलं ! संपत्तीचं काही नाही हो केले नाही केलं तरी त्यावाचून अडत नाही. एकमेकांच तोंड न पहाणारे /पहाणारे त्यानिमीत्त्याने एकत्र येतात आणि उस्तवार करतात. पण हे करणं मात्र गरजेच आहे.