मृत्यू

Submitted by रिंकी on 14 January, 2019 - 03:57

त्याच्या येण्याची ,अलगद असते वाट
काहीसा वेगळाच असतो, त्याचा थाट

येताना मात्र 'एकटा - च' येतो पण!
जातांना स्वता:चा ,डंका वाजवून जातो

गाजावाजा नसतो ,तो असतो स्वतःचा
दबक्या पायाने येवून, देतो एक तमाचा

कदर नाही कोणाची ,तोडतो नात्याची नाळ
आगळ्या वेगळ्या रहस्याशी ,जोडतो ' काळ'

त्याच्याही दारात होतो, वेगळा नृत्य
ओळखला जातो, त्याच नाव ' मृत्यू' ....

#रिंकी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे ...पण रिंकी तुझ्या सगळ्या कथा न कवितांचे शेवट दुःखी का आहेत...तू छान लिहीत आहेस...शेवटही पॉजीटीव करता येईल का पाहा या पुढच्या एखाद्या कथेत