Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22
फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!
कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होय रे
होय रे मन्या.. बरोबर..
कोल्हापुरात तिखट म्हन्जे चटणी..आणि आपण ज्याला तिखट म्हन्तो त्याला मिर्चीपुड म्हन्तात.. मी बरेच वेळा ऐकलेले आहे
माझा खुप घोळ होतो... (डोक्यात शिट्ट्या वाजातात :))
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
>>>कोल्हापु
>>>कोल्हापुरात तिखट म्हन्जे चटणी..आणि आपण ज्याला तिखट म्हन्तो त्याला मिर्चीपुड म्हन्तात..
आता मीच कन्फ्यूझ झालो...
मी तिखट ला तिखट म्हणतो..म्हणजे सगळे मिक्स असलेले (काळा मसाला) ते तिखट किंवा चटणी
आणि मिरचीपूड ला मिरचीपूड च म्हणतो
मध्ये मी पुण्यात एका दुकानात तिखट द्या म्हणालो तर तो म्हणे कसले तिखट..
चटणी म्हणल तर म्हणाला शेंगदण्याची की लसणाची?
अजून १
लखोटा - envelope
मन्या
मन्या म्हन्जे लेका तु पका कोलापुरी हाइस
आम्ही बिघडलोय म्हन्जे
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
वाडयावर
वाडयावर जेवणे... लक्षात टवणे... विजय देवणे
महान आहे
महान आहे शब्द्कोष
हर हर महदेव !
कोरड्यास- भाजी
भाकर- भाकरी
शेक- आमटी
चिपळून-कोल्हापूर - डिसेंट्री .
चिपळून-कोल
चिपळून-कोल्हापूर - डिसेंट्री . >>>> वर्षा... ... कुठेतरी ऐकलाय हा शब्द...
पण शेक म्हणजे आमटी हे पहिल्यांदाच ऐकतोय खरे म्हणजे
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
चिंता
चिंता वरशाचि पळुन गेलि
हा बी बी
हा बी बी पाहिला नी ऐंशीन आले धावत हितं कायतरी पोष्टायला -
समद्यास्नी - राम राम - काय विशेष? (कोल्हापुरात सर्रास म्हणतात - ''विशेष तुमच्याकडं!'' आणि गुड न्युज साठी सुध्दा 'विशेष' आहे असे म्हणतात)
काही वापरातले शब्दः
बल = बल्ब
फोलार = अलगद
ऐंशीन = जोरात
जोतिबा पन्हाळा = टरका = चकणा
घारी = घारगा
उश्शीर!! = म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन बराच वेळ झाला असेल तर..
आमानी = आम्हाला
तुमानी = तुम्हाला
पाक = सगळं (ह्याच्याबद्द्ल अंमळ डाऊट आहे..)
लडतर = लचांड
झाम झाम = जोरात..
शिवाजी पेठेतच ल्हानाची मोठी झाले असल्या कारणानं किन्वा कोल्हापुरी भाषेत "म्हणताना" ही असली भाषा नी 'र,ल,भ' च्या मंत्रावळी नेहेमीच कानावर पडत असायच्या
प्रिया.. लै
प्रिया.. लै भारीच कि ओ... कुठ दडुन बस्ला व्ह्ता इतक दिस ?
जोतिबा पनाळा... आणि आमानी-तुमानी... खास कोलापुरी..
त्ये तुमानी कळायचे न्हायी...असे अगदी सर्रास वापरतात...
आणि कोल्हापुरात.. बाईचा पुतळा म्हणुन ठिकाण आहे..राजरामपुरी चौदावी गल्ली बहुतेक...
तो पुतळा खर तर आई आणि ती शाळेला घेउन जात असलेली दोन मुले असा आहे..आणि ती त्या मुलाना शाळेकडे बोट दाखवतेय...
पण लोकानी त्याला आइचा पुतळा न म्हनता बाईचा पुतळा करुन टाकले
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
>>>''विशेष
>>>''विशेष तुमच्याकडं!''
अगदी बरोबर प्रिया
>>पाक = सगळं (ह्याच्याबद्द्ल अंमळ डाऊट आहे..)
हे पण बरोबर... जसे पाक धूऊन टाकलं बघा राव (आता हे पण context वर आहे, हे खाण्यात, क्रिकेट मध्ये इ.इ. कुठेही वापरता येईल)
>>उश्शीर!! == उश्शेsssर
>>पण शेक म्हणजे आमटी हे पहिल्यांदाच ऐकतोय खरे म्हणजे
मी पण
केदार्,फार
केदार्,फार्फार पूर्वी मी येत असे मायबोलीवर .. मध्ये काही कारणाने संपर्क तुटला - आता पुन्ना (हेही कोल्हापूरच ) सुरू केला..
"लेडिज बायका" = स्त्रिया
गिरवी = ग्रेव्ही (हा शब्द मेनूकार्ड वर मी स्वतः पाहिला आहे.)
पडशीला = पडशील
खावावं = खावं
जगात भारी मीनाकुमारी = नाद्या बाद = नादखुळा गणपतीपुळा = लै भारी
अजून काय काय आठवायलंय .. टाकते हळूहळू
आणि
आणि कोल्हापुरात ना
जित्राप = गुरं (हा शब्द ग्रामीण साहित्यात आढळ्तो.)
खुळ्या टाळ्क्याचं = अत्यंत वेडपट
कुटं = कुठे
वरकी = हा एक टोस्टचा प्रकार आहे बहुधा
गुच्ची = बुक्की
बोंबाललं = बोंबललं
आणि काही काही क्रियापदांना / शब्दांना अनुस्वाराचं वावडं!
सपल सगळं! = संपलं सगळं!
थुक्की = थुंकी
आशुतोष चा उच्चार आशितोष च केला जातो
जित्राप =
जित्राप = पिकं
------------------------------------
It's good that you can laugh at yourself.
गजानन , मला
गजानन , मला जित्राप = गुरंढोरं असा अर्थ वाचल्याचे आठवते ..
कोल्हापुरात नेहमी म्हणतात "क्रिकेटनं खेळुया" / "चेंडूनं खेळुया".
गावलं = सापडलं
कावला = रागावला
मनाचे श्लोक शिकीवणे = उगीच भाव मारणे
हेन तेन = इत्यादि
प्रिया
प्रिया
कुठे होता इतके दिवस?
घमेलं =
घमेलं = लोखंडाची पाटी
बुट्टी = पाटी
************
To get something you never had, you have to do something you never did.
दक्षिणा
दक्षिणा बाई
अग पूर्वी मी यायचे ना इथे 'रुतु हिरवा' म्हणून .. नंतर २ वर्षे नाहीच फिरकले .. एव्हाना पास्वर्ड बिसवर्ड 'कम्प्लेट' विसरलेले
सो हा आय डी घेतला ..
हे घ्या अज्ज्जून लै लै भारी शब्द :
जाग्याव पलटी
गंडलईस
चरचरीत
लै शानं झालंईस
बोलून घान केलीस बग ! (माझा फेवरिट
काय राव
जिकल्यात जमा
जिकलंस भावा
आरं मर्दा
तूच रे!
सपलच की !!
काय काय आनि?
आव्हान सप्पुष्टात..
लय झालं आता
लेकाच्या!
च्या भात खाऊन ये जा..
कोन कटवलईस काय नाई?
आनि काय निवान्त शिवान्त?
आनि काय मन्तईस (म्हणतो आहेस ?)
सायबांची क्रुपा..
हान तिच्यायला
वरिप उडीप (याचा अर्थ अजून नीट ठाऊक नाईये मला .. पण 'ओरपून खा' या अर्थाने 'वरिप' वापरतात.)
डोक्याव पडलईस काय!
बाकी
सतत वापरतात असा :""काय वडिन्ग्यासनं आलईस काय ?"
याची स्टोरी ठाऊक असेलच ना की सांगू??
अजुन एक "
अजुन एक " माही "
सध्या खेड्यामधील जत्रे ला हा शब्द वापरतात.
या माह्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामधे भरतात
अजुन एक "
अजुन एक " माही ">>>
अवो पावन, त्ये माघी यात्रा याचे ग्रामिनिकरन हाय... बहुतेक जत्रा आपल्या भागात माघ, चेत्र महिनाय्त होतात...
उदा... जोतिबाची चैत्री वारी, माही जत्रा वैगेरे...
सतत वापरतात असा :""काय वडिन्ग्यासनं आलईस काय ?">>> प्रिया मला माहित असलेली इथे आधिच टाकलेली होती, पण ती पुसुस्न गेली...तुला माहीत असलेली टाक इथे,,,सर्वाना समजेल..
ते असेच म्हणजे.. गावात लाइट आल्ली, आणि लोकाना वाटले आग लागली कि काय म्हणुन सगळे पळत सुटले असेच आहे ना काहितरी ?
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
केदार आधी
केदार
आधी बहुधा मीच टाकली होती ती माहिती ..
बरोबर आहे तुमचं म्हणणं - खरं तर या गोष्टीची सत्यासत्यता ठाऊक नाहीये मला..
वडिंगे = वडणगे हे कोल्हापूरच्या जवळचं एक गाव. कोल्हापूर मध्ये जेव्हा प्रथम विजेचे दिवे लागले तेव्हा वडिंग्याच्या लोकांनी ते दुरून पाहिलं आणि त्यांना वाटलं की कोल्हापुरात आगच लागली ! मग म्हणे ते सगळेजण पाण्याच्या बादल्या घेऊन कोल्हापूरच्या दिशेने पळत सुटले म्हणून कोणी असे बावळटपणा करताना दिसले की म्हणतात "काय वडिन्ग्यास्नं आलईस काय ? "
इथे कुणी वडणग्याचं असेल तर त्यांनी प्लीज दिवे घेणे
हे बरोब्बर
हे बरोब्बर आहे प्रिया...
हा बीबी मनकवड्याने सुरु केला तेव्हा मी पण टाकलेले हेच..पण ते वाहुन गेले...मग आता वहाता न ठेवता बांध घातलाय त्याला..
बोलून घान केलीस बग ! >>> हा पण लै भारी हाय...
आणि लोक्...काय प्येठ्येत ला नव्ह का तू... अस म्हनला कि बहुतेक शिवाजी पेठच असती..
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
प्रिया,
प्रिया, नाद खुळा एकदम!!!
>>वरिप उडीप (याचा अर्थ अजून नीट ठाऊक नाईये मला .. पण 'ओरपून खा' या अर्थाने 'वरिप' वापरतात.)
हो..आणि असाच वरबाड..
>>च्या भात खाऊन ये जा..
म्हणजे?/?
>>कोन कटवलईस काय नाई?
अजून १
खिरीत खराटा - ४ माणसांचे जेवण (पार्टीला) असताना अचानक कोणीतरी आपल्या बरोबर अजून २-३ जणाना घेऊन येताना त्याना सांगतो चल तू पण्...खिरीत खराटा आढू
>> अस म्हनला कि बहुतेक शिवाजी पेठच असती..
एकदम बरोबर
रात्री
रात्री कुठेही कानावर पडणारा एक निरर्थक संवादः
१ काय काय आनि?
२ तुमच्याकडं.
१ जेवलासा?
२ उश्शेर..
१ काय आनि विशेष?
२ निवांत बगा..
१ हुन्द्या मग शिस्तीत्...चलतो
२..बअरं बअरं
प्रिया...
प्रिया... एकदम कोल्हापुरात आल्यागत वाटलं बघ...
काय काय आनि?
आनि काय मन्तईस
लेडिज बायका >> हे सगळ्यात भारी...
>>निरर्थक
>>निरर्थक संवादः
लई भारी
(झोलं दे
(झोलं दे त्याला.)
(दे हालवुन)
प्रिया
प्रिया जबरा!
तुझ्या पोस्ट वाचल्या आनि माझे समदे कोलापुरी दोस्त लोक यकदम भेटाय आल्यावानी वाटल बग!
लै भारी!
तुझ्यामुळ
तुझ्यामुळं मी अंदरबट्ट्यात गेलो....
अंदरबट्टा = तोटा....
डेरा /
डेरा / मटका
बुट्टी
पातेलं
साळूता
शिंगाडं
अजुन एक
अजुन एक शब्द
लै गुळमाट असतया.. >> म्हण्जे गोड किंवा कमी तिखट्-मसालेदार जेवण.
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
Pages