एक तुझे शहर आता एक माझे शहर

Submitted by द्वैत on 11 January, 2019 - 11:04

एक तुझे शहर आता एक माझे शहर

कुणाचीच कुणाला इथे नाही खबर
एक तुझे शहर आता एक माझे शहर

हव्या त्या आकाशात हवे तसे विहर
एक तुझी लहर आता एक माझी लहर

मला तुला नको ह्या जगाला कळू दे
एक तुझा कहर आता एक माझा कहर

कसे कधी फुलायचे विसरून गेला
एक होता कधी जो तुझा माझा बहर

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users