विरह रात्र

Submitted by स्वर on 31 March, 2009 - 01:16

चंद्र नाही सोबतीला,एकटी आज आली
रात्र शुभ्र गोमटी, आज काळोखात न्हाली

हसरी लाजरी रजनी, नित्य नवकांता
आज सलते उरी विरहाची चिंता

मिठीत असतो चंद्र अन डोळ्यात किरणे
आज अंधाराशी बोलणे अन काळोखात झुरणे

शशि तार्‍यांचा प्रणय खेळ रोज जिथे दिसतो
आज मनीचा मोगरा त्या अंधार्‍या नभी जळतो

सोडवीत आकाशमिठी, पहाट रोज गोजिरी
आज जणू झाली मुक, हरिची बासरी

गुलमोहर: 

स्वर, खुपच सुंदर!
प्रेमाइतकाच विरहपण सुंदर ! !
Happy
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

छान.

सोडवीत आकाशमिठी, पहाट रोज गोजिरी
फारच सुन्दर

सुरेख Happy
-------------------------------------------------------------------------------
राग लोभ, अन खेद खंत हे
दिले घेतले इथेच ठेऊ
"तिथे" न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघुन जाऊ

स्वर,...अहाहा... नेहमीप्रमाणे सुंदर ! तुमच्या कविता खूप आवडतात.

छान!

सुंदर आहे कविता, आवडली !
____________________________________________

कृष्णासारखा सखा पाठीशी असेल तर येणारी संकटेही असामान्यच हवीत. संकटे जर सामान्य असतील तर तो कृष्णाच्या देवत्वाचा अपमान ठरेल ना !! Happy

विरह रात्र - छान...

सोडवीत आकाशमिठी, पहाट रोज गोजिरी
आज जणू झाली मुक, हरिची बासरी

आवडलं...