व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग ६ (क्रमश:)

Submitted by समई on 10 January, 2019 - 06:18

नेहेमीप्रमाणे सकाळी पुरीभाजीचा ब्रेकफास्ट करून आम्ही व्हॅन ने मेकाँग डेल्टा साठी निघालो.आमचे पहिले ठिकाण एक बौद्ध मंदिर होते.
बौद्ध मंदिर दूर असल्यामुळे गाईड आम्हाला फ्रेश होण्यासाठी
एका ठिकाणी घेऊन गेला.पुष्कळ गाड्या आणि लोक येत जात होते. आंम्हीही उतरून आत गेलो.तिथे टॉयलेटची सोय होती.त्याच्या मागच्या बाजूला खाण्यापिण्यासाठी एक हॉटेल होते.त्यात एक सुंदर गार्डन होते.तिथले थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो.
गुलाबी,पांढरी सुंदर वॉटर लिली
20190105_092028.jpg
तळ्यात गवताच्या बाहुल्या
20190109_132407.jpg
आम्ही दोघे
20190105_090744.jpg
एक अनामी फळांचे झाड20190105_092204.jpg
हे मंदिर मेकाँग रिजन मध्ये आहे.हो ची मिन्हच्या दक्षिण भागात हे मंदिर आहे.मंदिर 2 हेक्टर जागेत बांधले आहे.
ह्याचा इतिहास असा आहे की 1859 ते१८६२ मध्ये फ्रेंच कॉलॉनिअल फोर्सेस आणि त्यावेळच्या तिथल्या राजात युद्ध झाले.त्यात फ्रेंच सैनिक विजयी झाले.त्यात मंदिराचे खूप नुकसान झाले होते.
एका व्हिएतनामी धर्मगुरूने ह्याचा जीर्णोद्धार १८90 मध्येकेला.पण १९०४ मध्ये एक भीषण वादळात ह्याची बरीच पडझड झाली.दुसऱ्या धर्मगुरूने परत ह्याचा जीर्णोद्धार केला.
त्याने ३ मुख्य प्रवेशद्वार, एक धार्मिक कार्यासाठी मोठा हॉल,
आणि patriarch हॉल बांधला.मुख्य द्वार स्टीलचे आणि बाकी
दोन काँक्रीट ची आहेत आणि ऐतिहासिक किल्याच्या रुपात आहेत.,उजव्या आणि डाव्या बाजूला दोन मोठे पुतळे आहेत.
देवळाच्या मुख्य हॉलमध्ये बर्याच बुद्धाच्या मूर्ती आहेत.ज्यात अमिताभा बुद्ध,गौतम बुद्ध,वेगवेगळे अरिहंत आणि बौद्धसत्व ह्यांच्या मूर्ती आहेत.मुख्य मूर्त्या तांब्यापासून बनवल्या आहेत.एक मोठी मूर्ती जेड राजाची आहे.इथे आम्हाला बरेच बौद्ध भिक्षुक मातीच्या पात्रात जेवताना दिसले.इथे मंदिराच्या आवारात बरीच दुकाने आहेत.जिथे वेगवेगळ्या आकाराच्या उदबत्त्या ,भरतकाम केलेल्या पर्सेस,व्हिएतनामी टोप्या वगैरे अनेक वस्तू विकत मिळतात.अर्थात घासाघीस खूप करावी लागते.नन्तर अर्ध्या किंमतीत वस्तू मिळतात.
इथल्या मूर्तींसमोर पूजा म्हणजे उदबत्त्या जाळणे,व भक्तिभावाने नमस्कार करणे.त्यामुळे सर्व मंदिरे अतिशय स्वच्छ आहेत.सगळीकडे शांतता असते.मंदिराच्या आसपास खूप फळझाडे आणि बोन्साय केलेली झाडे आहेत.इथे आमचे कॉफी पान आणि थोडे शॉपिंग झाले.
मंदिराचा फोटो
20190108_182331.jpg
हसरा बुद्ध
20190110_083136.jpg
झोपलेला बुद्ध
20190104_153457.jpg
जेड राजाची मूर्ती
20190110_073721.jpg
मंदिराच्या बाहेर बोन्साय केलेली झाडे
IMG-20181209-WA0061.jpg
मंदिरातल्या तळ्यात झाडांची केलेली सुंदर रचनाIMG-20181209-WA0063.jpg
मंदिर पाहून आम्ही मेकाँग डेल्टा पाहायला निघालो. साधारण एक तासात आम्ही तिथे पोचलो.दक्षिण व्हिएतनाम मध्ये असलेला हा डेल्टा म्हणजे विशाल पात्र असलेली मेकाँग नदी आहे.ही दक्षिणपूर्व आशियातली सातवी मोठी नदी आहे आणि जगातली बारावी मोठी नदी आहे.चीन मध्ये उगम पावून ती तिबेट,म्यानमार,लाओस,थायलंड,कंबोडिया आणि व्हिएतनाम इतक्या देशाना सुजलाम सुफलाम बनवून शेवटी दक्षिण चीनच्या समुद्रात विलीन होते.तिच्यात अनेक बेटं आहेत.तिचे विशाल पात्र पाहून समुद्राचा आभास होतो.अनेक वर्षांपासून ह्या नदीद्वारे वेगवेगळे व्यापार होतात.व्हिएतनामी सरकारच्या ताब्यात असलेल्या नदीमुळे शेती आणि मत्स्यपालन व्हिएतनाम साठी एक वरदान ठरले आहे.इथे असलेल्या बेटावर नावेने आम्हाला नेण्यात आले.
बोटीने बेटावर जात असताना दूरवर दिसलेला नदीवरचा पूल
20190110_081003.jpg
अश्या बोटीतून टुरिस्टना बेटावर नेतात
IMG-20181209-WA0066.jpg
इथे मधमाश्या पालन केंद्र आहे.अनेक प्रकारची झाडे इथे आहेत.त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मध इथे विकत मिळतात.
पर्यटकांना वेगवेगळ्या मधाचा चहा टेस्ट करायला देतात.इथे एका अजगराला घेऊन एक बाई उभी होती.माझ्या मिस्टरांनी तो अजगर प्रेमाने आपल्या गळ्यात घातला.
अश्या तर्हेने इथे मधमाश्यांचे पालन केले जाते.
IMG-20181209-WA0181.jpg
मिस्टरांनी गळ्यात घातलेला अजगर
20190109_073743.jpg

आम्ही तिथे हनी वॅक्स घेतले,जे ओठ मऊ ठेवतात असे विकणाऱ्या मुलीने सांगितले.सध्या इथल्या भयंकर थंडीत मी ते वापरत आहे.बेटावर अनेक वस्तू विकायची दुकाने आहेत.नन्तर आम्हाला कोकोनट कँडी बेटावर नेले.तिथे ५६ हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे अशी माहिती मिळाली.ह्या बेटावर नारळापासुन कॅण्डी बनवतात.ती कशी बनवतात ते आपल्याला दाखवतात.अगदी नारळ खोवण्यापासून ,त्याचे दूध काढून मग त्यापासून मिठाई बनवली जाते.कँडी विकतही मिळते.तिथे एक मद्यधुंद झालेला तरुण मुलांचा ग्रुप आत आला त्यामुळे पहिले भीती वाटली, पण विशेष उपद्रव न करता ती निघून गेली.तिथे नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या वस्तूंची व इतर वस्तूंची विक्री करणारी दुकाने पण होती.तिथे फेरफटका मारला.नन्तर आम्हाला तिथल्या एक कॅनाल मधून बोटीने नेले गेले,तेंव्हा खूप मजा वाटली.बोटी बहुदा बायकाच चालवतात.
20190109_073914.jpg
कॅनॉल मधून जाताना मिस्टरांनी काढलेला माझा फोटो.मागे वृषाली
IMG-20181209-WA0130.jpg
कॅनॉल मध्ये मी त्यांचा टिपलेला फोटो
IMG-20190110-WA0033.jpg
कॅनॉलमध्ये बदकेही दिसली
IMG-20181209-WA0071.jpg
तळलेला मासा जेवताना आणला.
IMG-20190110-WA0034.jpg

तिथे जेवून परत आम्ही बोटीवर आलो.तिथे सगळ्यांना शहाळे पाणी प्यायला दिले.इथे शहाळ्यात पाणी खूप असल्याने आत
नारळाची मलई नसते.मग आम्ही जिथून डेल्टा पाहण्यासाठी बोटीत बसलो,तिथेच नेण्यात आले.अशा प्रकारे आमची आजची
सफर सम्पली. व आम्ही घरी परतलो.
घरी मस्त छोले,पुरी आमची वाट पहात होते.जेवून परत बदामसात खेळून निद्राधीन झालो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलेय…

ती फुले म्हणजे आपली कमळे आहेत, वॉटर लिली नाही.

फळे बहुतेक पपनस आहेत असे वाटतेय.

तुम्ही टेक्नॉलॉजी छान वापरताय. फोटोही चांगले अपलोड झालेत व लिखाणही सुंदर जमलंय.

समई ताई, तुम्ही खूप छान लिहिता आहात. हे दोन्ही देश माझ्या टु गो लिस्ट मध्ये केव्हापासून आहेत. वाचायला मजा येते आहे. पण मला आधीच्या भागातले फोटो दिसत नाहीयेत. फक्त ह्याच भागातले दिसत आहेत.

मदत पुस्तिकेत असे लिहिले आहे की जे फोटो 20mb पेक्षा जास्त झाले तर ते आपोआप डिलीट होतील.आणि माझे फोटो मोठे आणि जास्त mb चे झाले असावेत.