जेव्हा प्रेम

Submitted by शिवाजी उमाजी on 10 January, 2019 - 02:21

जेव्हा प्रेम

जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं
मन फुल हलकेच मग दरवळू लागतं

चालण्या न् बोलण्याचा झोका होतो
नाजूक कोमल मनमोर पिस मोहरतं

सुगंधित भासतो धुंद आसमंत सारा
घ्यावा मनगंध भरुन कवेत हे सुचतं

श्रृंगारते निल लहर लहर सागरी, मन
आसक्त भेटण्या पैलतटास आसुसतं

गंधाळतो प्रहर न् प्रहर दिवस रात्रीचा
अष्टोप्रहर सहवास असावा मन मागतं

© शिवाजी सांगळे
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t31482/new/#new

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults