मैत्री एक जीवाभावाचा बंध

Submitted by mrunal walimbe on 10 January, 2019 - 00:30

#मैत्री
#एक जीवाभावाचा बंध
मैत्री या शब्दाची व्याख्या दिवसेंदिवस बदलत चालली आहे. पूर्वीसारखी मैत्री ची व्याप्ती आता नवीन पिढीला उमगतचं नाही .एक काळ होता जेव्हा मैत्रीखातर लोक काय वाट्टेल ते करायला तयार असतं पण आजकालच्या virtual अन् digital जमान्यात सगळं काही बदलून चं गेलयं. Facebook च्या friend list वर किती मित्र मैत्रिणी यावरचं त्या माणसाचं वा व्यक्ती चं fan following ठरतं जसं daily soup च्या trp वर त्या serial ची लोकप्रियता ठरते अगदी तसं...
एक काळ होता जेव्हा जिवाभावाच्या मित्र मैत्रीणींना बहीण वा भावाचा दर्जा मिळे. एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी जीव धोक्यात घालायला ही मागेपुढे बघत नसे .अश्या मैत्रीची जाणीव तरुणाईला कधी होणार कोणासं ठाऊक?
तरुणाईच्या भाषेत तर पटलं तर पटलं नाही तरं तोडून टाकलं असचं असतं.पण कुठलीही गोष्ट निभावण्यासाठी त्याला थोडा वेळ अन् थोडा patienceया दोन गोष्टींची प्रामुख्याने गरज असते. त्या दोन्ही गोष्टी या पिढीकडे नाहीत त्यामुळे त्यांच्या दृष्टीने धरसोड पध्दतीची मैत्रीचं बरी.....
मैत्री सारखी पवित्र दुसरी कुठलही गोष्ट नसते. मैत्रीच्या नात्यातं कधी स्वार्थ नसतो चढाओढ नसते फक्त आपुलकीचा अन् प्रेमाचा जिव्हाळा असतो
म्हणूनच या नवीन तरुणाईला आवर्जुन सांगावेसे वाटते मैत्री करा त्यातं कंजुषी करु नका अन् ती निभावण्याचा जीवातं जीवं अससोस्तवर प्रयत्न करा.कारणं....

*मैत्री सारखी दुसरी
देणगी नाही*
मनाच्या अलगद कोपऱ्यातील
गुपित उघड करायला
असले लं हक्काचं स्थान
म्हणजे मैत्री
*मैत्री एक अतूट नातं*
जे तप्त उन्हातही असतं
सावलीसमं
वसंतातल्या गुलमोहरासमं
अलवारं फुलणारं
अन् सहवासाच्या चांदण्यातं
मनमुरादं खुलणारं
*मैत्री एक अभेद्य साथं*
सदैव मदतीचा हात देणारी
अन् संकटांना सोबतीनं
मात देणारी
*मैत्री एक असं घरटं*
जिथे मिळे वणव्यातही सहारा
अन् दुर्देवातही थारा
*मैत्री एक अनमोल ठेवा*
हृदयातून जपण्यासारखा
अन् अंतापर्यंत साथ
निभावणारा

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults