तू जणू श्वासात सामावून गेलीस

Submitted by द्वैत on 9 January, 2019 - 10:01

काळजाला थेट तू घेऊन गेलीस
एक अनोखी भेट तू देऊन गेलीस

वेळ हा गेला कसा कळलेच नाही
तू कधी आलीस अन येऊन गेलीस

आज भिंती ह्या घराच्या धुंद झाल्या
तू तुझा रुमाल जो विसरून गेलीस

वाचले डोळ्यांतले तू भाव बहुदा
की उगीच गाली खळी खुलवून गेलीस?

मी तुला विसरून जाणे शक्य नाही
तू जणू श्वासात सामावून गेलीस

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users