ऐ दिल ए नादान ....

Submitted by असुफ on 8 January, 2019 - 10:55

हे गाणं ऐकताना समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा मतितार्थ उर्दू भाषेत ऐकतोय अस वाटतं.
मनाची व्यथा, सततची हालचाल, अस्थैर्य, काहीतरी हवं आहे आणि यात गोंधळून गेलेले आपण की काय हवंय, का हवंय, काही कळेनासं झालेलं.
जे आहे ते सोडून किंवा त्याचा विसर पडून जे नाहीये त्यामागे धावणं आणि त्यासाठी दुःख करणं आणि त्यामुळे नसलेल्या समस्या निर्माण करणं, त्रास ओढवून घेणं आणि मग या आपणच ओढवून घेतलेल्या दुःखात असमाधानी असणं.
आपण घायाळ होतो, स्वतःला हानी पोहचवत राहतो, माझा दुःख किती मोठं, मी किती त्रासात आहे असा विचार करणं
या सगळ्या रामरगाड्यात, विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपण किती क्षुल्लक, य:कश्चित आहोत हे विसरणं.

शांत होणं आवश्यक नसलेली अस्थिरता कमी करणं, जे आहे त्यात प्रयत्नपूर्वक आनंद मानून, प्रगती करण्यासाठी आवश्यक तितकीच धडपड करणं आणि गीतेत सांगितल्याप्रमाणे इतर सर्व कृष्णार्पणमस्तु म्हणून सोडून द्यायला शिकणं हाच यावरचा उपाय असू शकतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users