व्हेन Life Gives You lemons

Submitted by आस्वाद on 7 January, 2019 - 15:59

थोडे दिवसांपूर्वी मोठं snow स्टॉर्म आलं होतं.. इतक्या लवकर नोव्हेंबर मध्ये कधी इतकं मोठं स्टॉर्म येत नाही generally. त्यामुळे ऑफिस मध्ये ऑफ नव्हतं. पण snow सुरु झाला लंच नंतर आणि मग वाढतच गेला... हळूहळू जाग आली सगळ्यांना... आणि नेहमीप्रमाणे HR ला सर्वात शेवटी. त्यामुळे ऑफिस जरी नेहमी पेक्षा लवकर बंद झालं तरी अगदी भर वादळात निघणं कठीण होतं. तरीही सगळे निघालेच.
सगळ्याच जवळपासच्या ऑफिसेस मध्ये असंच झालेलं. त्यामुळे रस्त्यावर तोबा गर्दी. त्यात फूट - २ फूट स्नोव आणि भरीतभर म्हणून accidents....
मी जास्त हुशारी करून मेन रोड सोडून दुसऱ्या रस्त्याने निघाले.... थोडं अंतर गेल्यावर चूक लक्षात आली. समोरचं काहीच दिसेना... रस्ता कुठे चालू होतोय आणि कुठे संपतोय तेच कळेना... शेवटी एका community मध्ये गाडी पार्क केली आणि snow संपायची वाट बघत बसले. त्या नंतर जवळपास ६ तासांनी घरी पोचले (नेहमी अर्धा पाऊण तास लागतो)
दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये हीच चर्चा. कोणाला किती वेळ लागला. कोण कसं अडकलं etc सगळे जण कुरकुरत होते... सगळ्यांनाच ५-६ तास लागले होते. सगळेजणं हेच म्हणत होते कि लवकर निघायला पाहिजे होता. फार चुकीच्या वेळेस निघालो त्यामुळे फसलो. खूप त्रास झाला etc... माझ्या बाजूला एक intern बसतो- मॅट . त्याला विचारलं तर म्हणे कि तो ऑफिस मधेच बसला होता snow संपेपर्यंत. मग ७ वाजता निघाला आणि जवळच्या हॉटेल वर गेला. गर्लफ्रेंड ला पण तिथेच बोलावलं आणि मग सकाळी तिथून परत ऑफिस ला आला. म्हने "It was a nice dinner date for us!"
आम्ही सगळे अवाक... आपल्याला का असा काही नाही सुचलं करायला असा विचार करत सगळे परत कामाला लागले.
माझ्या मनात पण हाच विचार येत राहिला... आपल्याला का नाही सुचलं असा काही करायला? ३ तास गाडी मध्ये पेट्रोल जाळत, HR ला शिव्या मारत बसण्यापेक्षा ऑफिस मधेच बसले असते. नवर्यानी लेकीला १२ वाजताच घरी आणलं होतं.. मला इतकं पॅनिक मोड मध्ये जायचं काहीच कारण नव्हतं..
हळूहळू मोठं होताना आपण हि फ्लेक्सिबिलिटी हरवत जातो का?
मला आठवतं मागे ६ वर्षांपूर्वी Sandy Storm च्या वेळेस आम्ही असेच वेल्ले होतो. ते इतकं मोठं स्टॉर्म होतं कि जवळपास ४-५ दिवस आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी नव्हती. माझी युनिव्हर्सिटी, नवऱ्याचं ऑफिस सगळं जवळपास १ वीक बंद होतं. सगळेच ऑफिसेस बंद होते. पूर्ण १ वीक आम्ही काय मज्जा केली!! आमच्या बाजूच्या टाउन मध्ये इलेक्ट्रिसिटी होती... तिथला मॉल, दुकानं चालू होते. मग काय?? नुसता मित्र-मैत्रिणीं बरोबर फिरायचं, मॉल मध्ये शॉपिंग करायची, बाहेरच जेवायचं (अंधारात कसं स्वयंपाक करणार ना? ) आणि movies पाहायचे... मग रात्री घरी येऊन मस्त २-३ ब्लॅंकेट घेऊन गुडूप झोपायचं... Paid Vacation!!
हेच आत्ता जर झालं तर आम्ही असंच रिऍक्ट होऊ का? कि काय मेलं हे स्टॉर्म, light नाही, गॅस नाही... असं कुरकुरत बसू? मुलं झाल्यावर हि फ्लेक्सिबिलिटी कमी होते कि वयानुसार होते? खरंच एकदा तपासून बघायला पाहिजे. मॅट च्या उत्तराने माझे मात्र प्रश्न वाढलेत.
नवीन वर्षांत ही कविता जगण्याचा प्रयत्न करून बघायला हरकत नाही:
"Life handed him a lemon,
As Life sometimes will do.
His friends looked on in pity,
Assuming he was through.
They came upon him later,
Reclining in the shade
In calm contentment, drinking
A glass of lemonade.

Disclaimer:
कविता माझी नाही.
साभार : https://en.wikipedia.org/wiki/When_life_gives_you_lemons,_make_lemonade

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

खरे आहे. सध्या ट्रंप साहेब रोज काय काय करताहेत ते इथे वाचूनही हताश व्हायला होते. आमचा काय संबंध. पण तिथे तुम्हाला कसे वाटत असेल ते समजू शकते. पॉझिटि व अ‍ॅटिट्युड मस्ट आहे. कीप इट अप. लेखात खूप इंग्रजी शब्द आहेत. राज कारण दूर ठेवले तरीही तिथले जीवन अवघडच आहे बाई.

खूपच आवडला लेख!
एकदा लोकसत्तामध्ये वाचलं होतं बहुतेक. एका तिळ्या मुलांच्या आईने लिहिलेला किस्सा. असंच एकदा कामवाली बाई आली नाही, घरात मुलांचा खेळण्यांचा पसारा, भांडी घासायची पडलेली. एकूण सगळा वैताग. तेवढ्यात मुलानेच सुचवलं, बाहेर जाऊ या. आणि खरंच मुलांना घेऊन ती दिवसभर बाहेर गेली. जेवणखाण बाहेर. मजा केली. रात्री घरी येऊन मुलं झोपली आणि मग शांतपणे तिने सगळं आवरलं ( नवरा परदेशात होता वाटतं) . किती सोपा उपाय असतो खरं तर समोर, पण आपल्याला दिसत नाही Happy

छान लिहिलं आहे. I am responsible for wellbeing of another human being (child - who cannot take care of himself) ही भावना बहुतेक आपल्याला असं वागायला भाग पाडत असावी. I should perform my responsibilities above and beyond my abilities (rather than to the best of my ability)हे brainwashing आपल्याला अतर्क्य गोष्टी करायला भाग पाडत असावं.

पहिल्याच लेखाला इतके छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सगळयांना!!
मी पहिल्यांदाच मराठीत टाईप केलं, त्यामुळं काही शब्द टाईप नाही करता आले. आता जमेल Happy

अमा: अगदी माझ्या आईचेच वाक्य बोललात. ती इथे आली कि नेहमी म्हणते कि आपल्याकडे सगळं कसं सोप्पंय, इथे फारच अवघड आहे... Happy
वावे, राजसी: खरंच आहे, आपल्यालाच सुपर मॉम सिन्ड्रोम असतो... कधी कधी नुसता ब्रेक घेण्याची गरज असते
नानबा: माहित नाही या दोन्ही गोष्टी... लिंक टाका जमलं तर

अगदी अगदी. मी पण याच सिचुएशन मधे अडकले होते. ३-४ तास लागले त्या दिवशी जेमतेम २०-२५ मिनिटावर ऑफिस. नवरा पण सिटीतून येताना असंच अडकलेला. मुलगी एकटी घरी (१२ वर्ष) आणि लहान मुलगा माझ्या शेजारणीकडे. नशीब एक सुचलं की तिला त्या दिवशी तिच्या मुलांसोबत माझ्या मुलालाही शाळेतून घरी घेऊन जायला सांगितलं नाहितर बिचारा शाळेत अडकून पडला असता. नवराही वेळेत पोचू शकला नाही.
मुलीशी फोनवर बोलत होतेच. तिनेही जास्त पॅनिक न होता मॅगी करून खाल्ली. मी पण १-१.५ तास इथे तिथे सगळे रस्ते ट्र्राय मारून झाल्यावर सरळ मैत्रीणीच्या घरचा रस्ता धरला म्हटलं आता मला अजून कारमधे बसणं शक्य नाही. मुलांसाठी वाईट वाटत होतं पण इलाज नव्हता. तिच्याकडे चहा, गप्पा, खाणं सगळं उरकेपर्यंत रस्ते क्लिअर झाले होते मग २० मिनिटात रात्री ९ ला घरी पोचले.

प्रतिसादात ट्रंपचे नाव बघून हसू आले. जणू काही हिमवादळ ट्रंपमुळेच आले होते.

<<< आपल्याकडे सगळं कसं सोप्पंय, इथे फारच अवघड आहे. >>>
अगदी अगदी, मी इथे कसा "रोज" एक तासात 12 किमी जाऊ शकतो बघा, शिवाय गाडी चालवायला ड्रायव्हर असतो आणि मी आरामात बसतो. तुम्हाला 6 तास लागले म्हणजे फारच वाईट बै तुमची अम्रीका.

> अगदी अगदी, मी इथे कसा "रोज" एक तासात 12 किमी जाऊ शकतो बघा, शिवाय गाडी चालवायला ड्रायव्हर असतो आणि मी आरामात बसतो. तुम्हाला 6 तास लागले म्हणजे फारच वाईट बै तुमची अम्रीका. > Lol Lol

आणि सगळेजण हाटेलात राहायला गेलेतर तितके हॉटेल आणि रूम मिळतील का?
बादवे गर्लफ्रेंड हॉटेलपर्यंत कशी आली?

<<अगदी अगदी, मी इथे कसा "रोज" एक तासात 12 किमी जाऊ शकतो बघा, शिवाय गाडी चालवायला ड्रायव्हर असतो आणि मी आरामात बसतो. तुम्हाला 6 तास लागले म्हणजे फारच वाईट बै तुमची अम्रीका.>>
आई एकदा इथे आलेली तेव्हा २ महिने (जानेवारी - फेब) सारखे स्टर्म्स येत होते. म्हणून तिला असं वाटतं. मी आजकाल इंडिया-अमेरिका हा वाद घालणं सोडून दिलंय. कारण माझ्या मते प्रत्येकाची अमेरिका वेगळी आहे. प्रायॉरिटीएस वेगळ्या आहेत.

<<आणि सगळेजण हाटेलात राहायला गेलेतर तितके हॉटेल आणि रूम मिळतील का?
बादवे गर्लफ्रेंड हॉटेलपर्यंत कशी आली?>> ती पण जवळच जॉब करते ना. हॉटेल मध्ये नाही पण स्टॉर्म मध्ये सगळ्यांनी निघून चूकच केली ना. स्वतःला त्रास, दुसऱ्यांना त्रास.

आस्वाद, तुम्ही न्यूजर्सीत आहात असं दिसतंय. चूक सगळ्यांनी एकत्र निघून केली असं नसून टाऊन्स आणि त्यांचं प्लॅनिंग तयार (prepared) नव्हतं स्टॉर्म करता तसंच त्यांनी अंडरएस्टिमेट केलं. जर वेळेवर सॉल्ट टाकणारे ट्रक्स, स्नो प्लॉविंग ट्रक्स हायवेवर आले असते तर लोकांची इतकी वाईट अवस्था झाली नसती.

जर वेळेवर सॉल्ट टाकणारे ट्रक्स, स्नो प्लॉविंग ट्रक्स हायवेवर आले असते तर लोकांची इतकी वाईट अवस्था झाली नसती.>>+१

आणि सगळेजण हाटेलात राहायला गेलेतर तितके हॉटेल आणि रूम मिळतील का?>>> सँडीच्या वेळेस आमच्याकडे ५-६ दिवस वीज नव्हती तेव्हा आम्हाला आमच्या एरियात कुठेही रुम मिळाली नव्हती.

हो, सायो, मी न्यू जर्सी मध्ये आहे. अंडर एस्टीमेट सगळ्यांनीच केला. टाउन ने आणि लोकांने पण. नवऱ्याचं ऑफिस १२ वाजताच बंद केलं. सो तो मुलीला घेऊन वेळेत येऊ शकला. पण जास्तीत जास्त ऑफिसेस ३ नंतर बंद केले. मग ऐन स्टॉर्म मध्ये सगळे निघाले. खूप असिडेंट्स झाले, खूप गाड्या टोटल झाल्या.

माझ्या नवर्‍याचं ऑफिस बंद वगैरे नव्हतं केलेलं. तो दोनला निघाला जर्सी सिटीतून तेव्हा मला आश्चर्यच वाटलं होतं की इतक्या लवकर का? पण ज्या कम्युटला अदरवाईज ४५ मिनिटं लागतात तिथे त्या दिवशी त्याला १२ तास लागले.