धोक्याची घंटा

Submitted by चिंतामण पाटील on 4 January, 2019 - 22:38

धोक्याची घंटा..
sorry
तसं काही खास नाही...
चुंचाळे येथे मधमाशा दिसत नाहीत.

पण तरी हे वाचा...

मागच्या आठवड्यात चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे उदय महाजन यांच्या शेतावर शेंदळीची शेती बघायला गेलेलो. या रानभाजीच्या उत्पादनाची माहिती घेता घेता काकडीला फलधारणा न होण्याची समस्या कशी उभी ठाकलीय याची विस्मयकारी समस्या त्यांनी व्यक्त केली.
महाजन यांच्या काकडीच्या वेलांवर फुले तर बहरली पण ती पाहाता पाहता कोमेजून जाऊ लागली. फुलांचे काकडीत काही रुपांतर होईना. असं पहिल्यांदाच घडत होते. महाजन कुटुंब काकडी उत्पादनात अग्रेसर पण या समस्येचे उत्तर त्यांना सापडेना. माहितीतले प्रयोग करून झाले. पण फुले लागत....कोमेजून गळून जात. अनेक तज्ज्ञांनी भेट दिली पण, मार्ग निघेना. एक दिवस त्यांच्याच लक्षात आले की शेतात मधमाशांची भुणभुण काही ऐकू येत नाही. मग सत्य सूर्यप्रकाशासारखे समोर आले.
मधमाशा नाहीत तर ..
परागीभवन नाही..
परागीभवन नाही तर ...
फलधारणा नाही.
आणि मग त्यांनी दोंडाईचा येथील रावलांच्या मधमाशी संगोपन केंद्रातून मधमाशांच्या पेट्या आणल्या.
मधमाशांचा वावर सुरु झाला आणि काकड्यान्नी वेली वाकल्या.
आता
शेती नी शेतकऱ्याला कसा धोका आहे ते लक्षात आलेच असेल.
पण हा धोका किती गंभीर आहे हे आम्ही समजून घेणार नाही.
कारण अजून तरी आमच्या ताटात अन्न येतंय.
एवढीशी मधमाशी ती असली काय नी नसली काय!
काय फरक पडतो आम्हाला.
अहो तेव्हा नाही का लातूरला पाणी नव्हते तेव्हा सांगलीहून रेल्वेने पाणी पाजले होते. पाणी नसले की tankar नेही पाणी मिळतेच की! मग एक काकडी नाही मिळाली तर काय बिघडले.
पण धोका काकाडीलाच नाही तर शेतात जे पिकते त्या साऱ्याच पिकांना आहे.
असे म्हणतात की, “ शृषटीतील मधमाशा ज्या दिवशी नष्ट होतील त्या दिवसापासून मानवाचाही शेवट सुरु होईल”.
आता रोबोट मधमाशीचा झाला जन्म:
मधमाशांचे प्रमाण का घटले याचे उत्तर स्पष्ट आहे. हवामान बदल आणि रासायनिक औषधांची भरमसाठ फवारणी.
किटनाशकांच्या फवारणीला तर आता अटकाव होत नाही मग मग मधमाशांची सुरक्षा कशी होणार?
मग मरू द्या मेल्या तर मधमाशा!
परदेशातील waalmart सारखी कंपनी रोबोट मधमाशीच घेऊन आलीय आपल्यासाठी. अहो तीचे पेटेंट देखील झाले त्यांच्या नावे.
हुश्श...काही भुके मरत नाही तर आपण! बाकी इतर जीव मेल्याने काही होत नाही.
जंगल साफ झाले की बिबळे, वाघ शहरात येतील...त्यांना गोळ्या घालता येतील.
शिवार बिनशेती झाली की टेरेसवर भाजीपाला पिकऊ.
मातीवर सिमेंटचे जंगल उभे राहुद्या...कसली चिंता without soil ची vartical, hydroponics शेती करू.
तेव्हा मग शेती लागणार नाही नी शेतकरी.
मी उगाच चिंतेत टाकले तुम्हाला...

टिप:
आणखी एक आपली कापसाची शेती परावलंबी करणारी monsanto कंपनी पण रोबोट मधमाशीच्या संशोधनात आहे बर का. मग काय चिंता... रांगेत उभे राहून घेऊ रोबोट मधमाशा.
मरू द्या मधमाशा, भारतीय शेती भारतीय शेतकरी.

मधाचे पोळे.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

असे म्हणतात की, “ शृषटीतील मधमाशा ज्या दिवशी नष्ट होतील त्या दिवसापासून मानवाचाही शेवट सुरु होईल”. >>>>>> सत्यवचन

तुमच्या मनातील कळकळ जाणवली.

धोक्याची घंटा.. >>>>
अशा कितीही घंटा वाजूदेत, आम्ही जागे होणारच नाही ... अशी मानसिकता असल्यावर पुढे काय होणार ??

दुर्दैव आपले....

ऐकावं ते नवलच!
पण खरंच या घंटा ऐकू न येण्याइतके बहिरे झालो आहोत आपण!

यावर मार्ग काय आहे? >>>

मधमाशांचे प्रमाण का घटले याचे उत्तर स्पष्ट आहे. हवामान बदल आणि रासायनिक औषधांची भरमसाठ फवारणी.

अनेक शास्त्रज्ञ, सामाजिक संस्था यावर काम करीत आहेत, त्यांची मदत घेऊन रासायनिक किटकनाशकांना सुयोग्य पर्याय शोधणे.

Dhokyachi ghanta anek babateet olandali ahe.
Mee maaybolivar ek dhaga kadhalela tyavarache replies vafhalyavar, the doom is inevitable Karan nobody really cares to even understand d issue as maze mat zale aahe.
Humans is a stupid race, internals yes! Wise, no way!
Believe me there are people who will take a fancy at d idea of robot bee

ज्या दिवशी पृथीवरून मधमाशा नाहीशा होतील त्यानंतर पुढील चार वर्षांनी मनुष्य प्रजाती नष्ट होईल.- आईन्स्टाईन