कबूली

Submitted by शब्दरचना on 4 January, 2019 - 22:02

आज पुन्हा नव्याने त्याने
त्याच्या प्रेमाची कबूली दिली
आनंदाने म्हणा किंवा दुःखाने
पुन्हा माझ्या पापणीची कड ओलावली
अंतरात पुन्हा एकदा घालमेल जाणवली
कारण पुन्हा नव्याने त्याने त्याच्या
प्रेमाची कबूली दिली
पुन्हा कुठेतरी मनात हुरहुर दाटली

नेहमी हेच होतं . . . जुनंच त्याच प्रेम
तरीही नेहमी नव्याने जाणवतं
त्याच्या कबुलीत मग मलाही वाहवत नेत
माझ्या स्पष्ट नकारातपण तो
समजूतदारपणा दाखवतो
नेहमीसारखाच माझी वाट पहात राहतो

चांगलाच आहे तो . . . वाईट काही नाही
आपुलकी आहे . . . विश्वास आहे माझा
पण प्रेम मात्र नाही

माहित आहे मला पुन्हा एकदा तो
कबूल करेल प्रेम माझ्यावरचं
अन् मी खुळ्यागत निरीक्षण करेन
त्याच्या भिजलेल्या पापण्यांच . . .
नेहमीसारखाच ठरवेन तो
माझ्यापासून दुर जाण्याचं
मनावर माझ्या देउन ओझं
उगाचच अपराधीपणाचं . . !

Group content visibility: 
Use group defaults

आवडली

नेहमीसारखाच ठरवेन तो
माझ्यापासून दुर जाण्याचं
मनावर माझ्या देउन ओझं
उगाचच अपराधीपणाचं . . ! >>> छानच

छान