Adjustment

Submitted by शब्दरचना on 4 January, 2019 - 01:16

Adjustment फक्त आम्हीच करायची का रे?
नाही! compromise तुही करतोसच म्हणा
पण तरीही तुला तुझ्या आई-बाबांना सोडुन कुठे जावं लागत नाही
ज्या भिंतीनी तुझं बालपण पाहीलयं . . ज्या खिडक्यांनी तुझ तारुण्य अनुभवलं . . . . त्या सगळ्या मागे सोडून तु थोडीना जातो ?

मान्य आहे मला थोडा गोंधळ तुझाही उडतो
पण तरीही सांग स्वतःच्याच आई वडीलांना भेटण्यासाठी
परवानगी घेण्याची तगमग तु कधी का रे अनुभवतो?

मुलांमागे धावताना career ला घातलेली मुरड माहीत आहे का रे तुला ?
हो तुही त्यांच्या भविष्यासाठीच धडपडतो
मग तुला तर कळत असलेच भूतकाळाकडे पाहताना
जीव का हळहळतो ?

माहीत आहे मला मुलांशिवाय दुसर सुख काही नसतं
पण उतारवयात मागे वळून पाहताना
आयुष्याचा आलेख लेखताना थोडं दुःखही होतं

नाही रागाउ नको ! please !तुला दोष मी देत नाही
पण खोड वाईट मनाची त्याला बोलल्याशिवाय राहवत नाही
लहानपणाच घर उगाचच ह्या माझ्या घरात शोधते
आई वडीलांच घर सोडल्यावर . . . स्वतः आई झाल्यावर
मुलीला सासरी न धाडण्याचा . . . जगाची रित बदलण्याचा
वेडा हट्ट धरते . . कितीही मोठी झाली ती तरीही मन तिला
लहानच म्हणते . . . !

Group content visibility: 
Use group defaults

मस्त,
नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने आजकाल माझ्यासारख्या पुरुषांना सुद्धा माहेरपण हवं आहे..

छाने

<<< मुलीला सासरी न धाडण्याचा . . . जगाची रित बदलण्याचा
वेडा हट्ट धरते . . कितीही मोठी झाली ती तरीही मन तिला
लहानच म्हणते . . . ! >>>> किती छान अन खरे सुद्धा Happy