स्वप्नांनी वास्तवाशी जेव्हा करार केला

Submitted by द्वैत on 3 January, 2019 - 12:01

स्वप्नांनी वास्तवाशी जेव्हा करार केला
माझ्यामधील कोणी माझ्यामधून गेला

मी ओळखून नव्हतो दुनिया खरीखुरी ही
मी पुस्तकांत केवळ माणूस वाचलेला

असतात चांगले ते जे गोड गोड हसती
असल्या खुळ्या मतीने व्यवहार चाललेला

ह्यांनी चुका स्वताच्या गाडून ठेवल्या अन
वरती खरेपणाचा बाजार मांडलेला

शहाणा समाज घेई ह्याची दखल कशाला
प्रेमात कोण वेडा का तडफडून मेला

रांगेत दर्शनाच्या आवाज कानी आला
"हल्ली इथे मी नसतो पुजता तुम्ही वीटेला"

भांडू नकोस "द्वैता" समजून घे जगाला
तुझ्यासमान येथे कोणी न बाटलेला

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्दर !
फक्त ""हल्ली इथे मी नसतो पुजता तुम्ही वीटेला"" मधे "मी" ची "गुरु" मात्रा नकोय , "मी" च्या जागी "लघु" मात्रेचा शब्द / अक्षर पाहिजे आहे !