दिवस आणखी थोडा वाढवावा...

Submitted by शब्दरचना on 2 January, 2019 - 22:32

आपणच तयार केलेल्या घडाळयात
आपल्याला आपल्यासाठीच वेळ नसावा
वाटतं मग उगाच दिवस आणखी थोडा वाढवावा
२४ तासात टाकावेत आणखी तास थोडे जास्त
निवांतपणे बसावे आईजवळ मस्त

नाहीतर नेहमीचा दिवस कसा निघून जातो
सोमवार रविवार मधला फरकच कळेनासा होतो
पहाटे सुरु झालेला दिवस रात्रीपर्यंत असाच बुजून जातो
दमून आलेला बाबाही अंथरूणावर पडल्या पडल्या निजून जातो

college -tution अभ्यास आपलाही वेळ निघून जातो
आईच्या जेवणाला compliment द्यायचही
आपण विसरून जातो
एकाच घरात राहूनही एकमेकांना आपण दिसेनासे होतो
घर , बंगला , गाडी सारं कसं दिमाखात येतं
पण येताना आपल्यातला सवांदचं हिरावून नेतं . .

मग वाटत दिवस आणखी थोडा वाढवावा . . . !!!

Group content visibility: 
Use group defaults