जनुक जिन्याची सर्पिल वळणे

Submitted by अनन्त्_यात्री on 2 January, 2019 - 02:55

जनुक जिन्याची सर्पिल वळणे
अणुगर्भातिल अदम्य लवथव
सूक्ष्माच्या प्रत्येक विभ्रमीे
अद्भुताहुनी उत्कट वास्तव

अथांगासही क्षुद्र ठरविते
असीम व्याप्ती विश्वाची
प्रकाशवर्षे मोजुनी थकती
स्थलकालाच्या थिट्या मिती

तरल-सूक्ष्म अन् अनंत- व्यापक
दोन्ही पैलू गहनाचे
शून्यस्पर्शी सूक्ष्मातून घडते
दर्शन मला विराटाचे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रिलेटीवीटी आणि क्वांटम मेकॅनिक्स समजलेले दिसत नाही आहे. मला समजले आहे. नंतर सांगेन.