नववर्षाच स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप?

Submitted by ashokkabade67@g... on 1 January, 2019 - 11:55

गत वर्षाला आपण सारेच 31डिसेंबर ला निरोप देऊन नव्या वर्षाच स्वागत करीत असतो .पण नेमक काय करतो हे कुणी सांगेल काय?जुने जाऊद्या मरणालागुण असे कवी जरी म्हणत असले तरीही गतकाळात मनाला झालल्या जखमा काळजाला झालेल दुख खरच विसरता येत का?ज्या क्षणांनि मनाला आंनदाने पुलकित केल ज्या काही मोजक्या क्षणांनी निराश मनाला जगण्याची उमेद दिली ज्या एका क्षणाने आयुष्य बदलुन टाकल असे सारेच निरोप देऊन विसरू शकतो का?एक वर्ष संपल आणि नववर्ष आल म्हणून आपल्यात वय वाढण्याशिवाय आपल्या जगण्यात काही फरक पडतो का.?आणि नववर्षाच् स्वागत करतो म्हणजे काय करतो तर घशात काही पेग दारू रीचवतो आणि पोटासाठी काही कोंबडे बळी देतो आणि एक जानेवारीला शुभेच्छा देतो.तोही ऊपचाराचा एक भाग म्हणून. दरवर्षी हेच घडत असत मग त्यत नाविन्य काय? जगात कशाला आपल्या आसपास जरा डोळे ऊघडे ठेवून पाहिल तर दिसत की अनेकांच्या जीवनात वर्ष बदलण्याने काहीच फरक पडत नसतो हातातोंडाची गाठ घालण्यासाठी नेहमीच त्यांची लढाई सुरुच असते मग बदलत काय?प्रश्न आणि प्रश्न मेंदूचा भुगा करणारे प्रश्न फक्त प्रश्न.?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मनाची थोड्या वेळासाठी का होईना, पण येणारा काळ सुखावह होईल, हि समजूत होते.
ते म्हणतात ना, 'दिल की तसल्ली के लिये खयाल अच्छा हैं'

एक जानेवारीला शुभेच्छा देतो.तोही ऊपचाराचा एक भाग म्हणून.

हे मात्र एकदम पटलं.