पोकळपणा...

Submitted by शब्दरचना on 31 December, 2018 - 11:09

जुन घर पाडुन तिथे मी आता नवीन घर बांधलय ,
खिडक्यांची जागा बदलुन मी दरवाजेही बदलून टाकले,
तुझ्या आवडीची चाहुल देणारे पडदे सुद्धा मी डोळ्यांआड केलेत,
सगळ काही बदलुन टाकल मी ,
अगदी तुझ्याबरोबर जगण्याची सवयसुद्धा ,
तु मात्र अजुनही तशीच हट्टी आहेस ,
सगळया बदलांवर मात करून येतेस ,
स्वप्नात येउन मला माझ्या जुन्या घरात नेतेस ,
मुद्दाम तूझी छाप संपूर्ण घरावर सोडुन जातेस ,
नवीन घरातल्या अन् बदलेल्या माझ्यातला पोकळपणा ,
मुद्दाम जाणवून देतेस . . . . ! ! !

Group content visibility: 
Use group defaults