सखा सप्तपदी भव :

Submitted by शब्दरचना on 30 December, 2018 - 23:32

जगासमोर जोडलेल्या नात्यासाठी किंवा कागदोपत्री नाही
मनापासुन माझा हवा होतास तू ,
माझ्यामधुन व्यक्त व्हायला हवा होतास तू ,
अगदी काहीच नाही तर...
माझ्या चेहऱ्यावरील एखादी रेष तरी हवा होतास तू,
" सखा सप्तपदी भव : " म्हणत माझ्याशी जोडलेल्या तुझ्या आडनावासारखा
स्पष्ट व्हायला हवा होतास तू . . . . . 

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान,
कमीतकमी शब्दात सुंदररित्या भावना व्यक्त केल्यात.
--------
किंवा कगदोपत्री हां टाइपो जरा दुरुस्त कराल का !