स्त्री -एक स्वयंसिध्दा

Submitted by mrunal walimbe on 29 December, 2018 - 11:15

स्त्री तू वसुंधरा जिवाश्मांची
तूच कामिनी यौवनाची
तूच वाघिणी हिमतीची
तूच स्वामिनी कुळाची
तूच भार्या पतीची
तूच माता लेकराची
तूच भगिनी भावाची
तूच सखी मैत्रिणी ची
तूच विद्या ज्ञान प्रसाराची
तूच सरस्वती सुरेल स्वरांची
तूच सरिता साहित्य रूपी जलाची
महाभारतातील द्रौपदी तू
रामायणातील सीता तू
सावळ्या कान्हाची यशोदा तू
शिवबाची जिजाऊ तू
लढवय्या अशी झाशीची राणीही तू
आजच्या युगाची प्रगती तू
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
खरचं साऱ्यांच्या यशाची गुरूकिल्ली तू
तुज वाचून न कुठला जीव
तुझ्याच उदरात आहे
उद्याचा भविष्यकाळ
तूच तर आहे साऱ्या विश्वाची जननी
असे न संपणारे अस्तित्व तू
म्हणूनच म्हणते
जपा या स्त्री शक्तीला
अन् वंदन करा तिच्यातील जननीला

मृणाल वाळिंबे

Group content visibility: 
Use group defaults