ए.. सखी

Submitted by Rekhaansh on 28 December, 2018 - 07:59

ए.. सखी

पुसुनी टाक हे आसू
का बांधे पायात बेड्या
काढुनी टाक मनातुनी
खुळे समजुती वेड्या

अगं वेडे का हे डोळे
आसवांनी भरले
हृदयात भीतीचे सावट
हुंदक्यांनी दरदरले

काढुनी टाक आता
भीती तू मनाची
लाज बाळगू नको
त्या आडमुठ्या जनाची

कधी तरी तू जीवन
असं काही जगशील
आज हसणारे जग
उद्या तुझीच वाहवा करतील
उद्या तुझीच वाहवा करतील

रेखा किरण सरोदे
सणसवाडी पुणे
९०२२११२२७७

Group content visibility: 
Public - accessible to all site users