सोनचाफा

Submitted by शब्दरचना on 25 December, 2018 - 22:24

आजही फुल होऊन जमीनीवर पडायचा हट्ट
फक्त तु वेचशील म्हणूनच केला,

वाट चुकवून तु यावे इकडे
हा सोनचाफाही जणू म्हणूनच बहरला,

पण ना तु वाट चुकली,ना तुझी ओंजळ भरली,
सोनचाफ्याची फुले मात्र वाटेवर
तशीच निपचित पडली...!!!

Group content visibility: 
Use group defaults

अहो व्ही बी तो सफेद चाफा होता
हा वाला सोनचाफा आहे
पुढे कवठी चाफा हिरवा चाफा नाग चाफा असे अनेक भाग येणार आहेत.

डुडायडू , तुम्ही शब्दरचना आहात? की त्यांनी त्यांचे मुख्यत्यार पत्र तुम्हाला दिलेय?
नाही, म्हणजे त्यांच्या वतीने तुम्ही उत्तर देताय म्हणून विचारतेय☺️

@डुडायडू तुम्ही दिलेल्या कवितेच्या विषयाचा नक्की विचार करु अगदी कवठी चाफा आणि नागचाफाहि.

@VB माफ करा माझ्याही लक्षात आले पण उशिराने आणि मी मायबोलीवर लेखन करण्यासाठी अजूनही नवीन आहे. सांभाळून घ्यावे.

धन्यवाद!

डुडायडू , तुम्ही शब्दरचना आहात? की त्यांनी त्यांचे मुख्यत्यार पत्र तुम्हाला दिलेय?
नाही, म्हणजे त्यांच्या वतीने तुम्ही उत्तर देताय म्हणून विचारतेय☺️ >>>>>> हहपुवा